कोल्हापूर : येथील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम.बी.बी.एस.च्या प्रथम वर्षात शिकणा:या औरंगाबादच्या विद्यार्थिनीने वसतिगृहाच्या चौथ्या मजल्यावरून सोमवारी सकाळी उडी मारून आत्महत्या केली. गंभीर जखमी झालेल्या श्रद्धा गंगाधर करे (22, रा. रायगडनगर, सिडको कॉलनी, बळिराम पाटील विद्यालयाजवळ औरंगाबाद) हिचा उपचारादरम्यान ‘सीपीआर’ रुग्णालयात मृत्यू झाला.
परीक्षेच्या कालावधीत श्रद्धा चिमाजी चौक येथील जिल्हा शल्य चिकित्सकांच्या निवासस्थानाशेजारील शासकीय वसतिगृहात राहत असे. परीक्षेनंतर ती पुन्हा औरंगाबादला परतत असे. तिने यंदा पाचव्यांदा परीक्षेचा फॉर्म भरला होता. 6 सप्टेंबरला वसतिगृहामध्ये राहण्यास आली होती. तिस:या मजल्यावरील रूम नं. 57 मध्ये मैत्रिणी पूजा डोंगरे व कुमोदिनी डोळस यांच्यासोबत ती राहत होती. रविवारी रात्री जेवण झाल्यानंतर सोमवारी अॅनाटॉमी विषयाची परीक्षा असल्याने रात्री उशिरार्पयत ती अभ्यास करीत होती. पहाटे 4ला ती पुन्हा अभ्यासाला उठली. पूजा डोंगरे सकाळी परीक्षेसाठी निघून गेली, तर कुमोदिनी झोपली होती. त्यानंतर श्रद्धा 9च्या दरम्यान बाहेर गेली. बराच वेळ ती रूममध्ये न आल्याने कुमोदिनी तिला शोधण्यासाठी बाहेर आली असता सफाई कामगार लक्ष्मण पोवार यांना मुलगी पडल्याचे दिसले. त्यांनी आरडाओरड केल्याने सवितासह वसतिगृहातील मुली खाली पळत आल्या. पडलेली मुलगी श्रद्धा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. श्रद्धाला ‘सीपीआर’ रुग्णालयात दाखल केले होते. (प्रतिनिधी)
गोळ्यांचे सेवन
चौथ्या मजल्यावर निळ्या
रंगाच्या सहा गोळ्या मिळाल्या.
उडी मारण्यापूर्वी तिने औषधे खाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. संबंधित गोळ्या ताणतणाव कमी करण्याच्या असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
‘तो’ फोन कोणाचा?
श्रद्धाला सकाळी साडेआठच्या सुमारास मोबाइलवर फोन आला. तो फोन कोणाचा होता, त्यावर काय चर्चा झाली की तिने त्यानंतर आत्महत्या केली? मोबाइलला पासवर्ड असल्याने ती नेमकी कोणाशी बोलली हे समजलेले नाही.