शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

मुलगा आणि भावाचे अपहरण करून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2017 05:25 IST

कोणत्याही गुन्ह्याशी संंबंध नसताना भाऊ आणि मुलगा यांचे घरातून पहाटे दोन वाजता अपहरण करून त्यांना

शशी करपे । लोकमत न्यूज नेटवर्कवसई : कोणत्याही गुन्ह्याशी संंबंध नसताना भाऊ आणि मुलगा यांचे घरातून पहाटे दोन वाजता अपहरण करून त्यांना बेकायदेशीरपणे कोठडीत डांबून ठेऊन जबर मारहाण करण्यात आल्याचा आरोप भाजपाच्या युवा मोर्चाचे पालघर-ठाणे जिल्हा सरचिटणीस अरुण सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात केला आहे. याप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी सिंग यांनी केली आहे. माहितीच्या अधिकारात माहिती मागवून एका बिल्डरकडून खंडणी मागितल्याप्रकरणी विरार पोलिसांनी गु्न्हा दाखल करून महिला पत्रकार ज्योती तिवारी, तिचे वडिल लक्ष्मीकांत तिवारी, रोहित कोनारी यांना ७ जून २०१७ ला अटक केली आहे. त्यानंतर याप्रकरणात आपला कोणताही सहभाग नसताना विरार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर, उपनिरीक्षक डोईफोडे, हवालदार गांगुर्डे यांच्यासह सात-आठ पोलीस साध्या वेषात १५ जूनच्या पहाटे दोन वाजता दरवाजा तोडून आपल्या घरात घुसले. घरात असलेल्या सीसीटीव्ही डिव्हीडी तोडून टाकला. त्यानंतर मुलगा अनुज सिंग (१८) आणि भाऊ अजित सिंग (३२) यांना बेकायदेशीरपणे विरार पोलीस ठाण्यातील लॉकअपमध्ये टाकले. त्याठिकाणी दोघांना रात्रभर बेदम मारहाण करण्यात आली. हा प्रकार कळल्यानंतर पोलीस तिवारीप्रकरणात खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भिती असल्याने आपण वसई कोर्टातून १५ जूनला अटकपूर्व जामीन घेतला. ही माहिती मिळाल्यानंतर विरार पोलिसांनी मुलगा आणि भावाला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सोडून दिले. असा आरोप अरुण सिंग यांनी केला आहे. पोलिसांवर करण्यात आलेले आरोप खोटे आहेत. तक्रार आली असेल तर त्याची शहानिशा केली जाईल, असे डिवायएसपी जयंत बजबळे यांनी सांगितले.