शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

भांडगाव येथील कुटुंबाला मारहाण

By admin | Updated: June 27, 2016 01:24 IST

म्हसोबा देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांकडून जबरी मारहाण करण्याचा व कुटुंबातील महिलांच्या छेडछाडीचा प्रकार होऊनही इंदापूर पोलीस निष्पन्न झालेल्या इतर दोन आरोपींवर गुन्हा दाखल

इंदापूर : तब्बल एक महिन्यापूर्वी भांडगाव येथील म्हसोबा देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांकडून जबरी मारहाण करण्याचा व कुटुंबातील महिलांच्या छेडछाडीचा प्रकार होऊनही इंदापूर पोलीस निष्पन्न झालेल्या इतर दोन आरोपींवर गुन्हा दाखल करत नाहीत, अशी तक्रार सोलापूर येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १० चे सहायक पोलीस फौजदार संभाजी शिंदे यांनी निवेदनाद्वारे इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांकडे केली आहे. संभाजी शिंदे हे ११ मे रोजी कुटुंबीयांसह म्हसोबा देवस्थानच्या यात्रेला भांडगाव येथे गेले होते. सायंकाळी परतताना, शिंदे यांची पत्नी व भावजय सोबत आणलेले शिल्लक सामान बरोबर असणाऱ्या वाहनात भरत होत्या. त्या वेळी देवस्थान ट्रस्टचे दत्तात्रय गायकवाड, नामदेव गायकवाड, दिलीप गायकवाड (सर्व रा. भांडगाव) हे त्या ठिकाणी आले. शिल्लक राहिलेले सामान ट्रस्टचे असते. ते तेथेच ठेवून जा, असे दत्तात्रय गायकवाड त्यांना म्हणाले. त्यावर आमचे घर जवळच आहे, असे शिंदे यांच्या भावजयीने सांगितले. शिंदे कुटुंबीय पीठ व लाकडे गाडीत भरत असताना, संभाजी शिंदे व त्यांच्या कुटुंबातील महिलांना वरील लोकांनी धक्काबुक्की केली. महिलांना का मारता, अशी विचारणा शिंदे यांनी केली. त्यामुळे वरील लोकांसह ट्रस्टच्या इतर सदस्यांनी एकत्र येऊन संभाजी शिंदे यांच्या डोक्यात, कपाळावर, हातापायांवर काठीने बेदम मारहाण केली. सोडवण्यासाठी आलेल्या मुले, सुना व नातलगांनादेखील मारहाण केली. त्यामध्ये बबलू धनाजी जाधव याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अस्थिभंग झाला. पाच महिन्यांच्या गर्भवती असणाऱ्या सुनेलाही सोडले नाही. महिलांची दगड व काठीने डोकी फोडली आहेत, असे शिंदे यांचे म्हणणे आहे. या संदर्भात शिंदे यांनी बावडा पोलिसांकडे त्याच वेळी तक्रार दिली. इतर आरोपींची नावे माहीत नसल्याने ती त्या वेळी देता आली नाहीत. मात्र, त्या वेळच्या ठाणे अंमलदारांनी एक आरोपी सापडला की, आम्हाला सर्वांची नावे कळतील, असे सांगून शिंदे यांची समजूत घातली. शिंदे यांनी चौकशी करून सतीश जाधव व बाळू गायकवाड या मारहाण करणाऱ्या दोघांची नावे पोलिसांना कळवली. त्यांचा आरोपींमध्ये समावेश करण्यात यावा. मारहाणीचा प्रकार गंभीर असल्याने भा.दं.वि. कलम ३२६, ३५४ ब नुसार सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली. मात्र, रात्रीच आम्ही सर्व आरोपींची नावे कळवली आहेत. आत्ता आम्ही काही करू शकत नाही, असे उत्तर सहायक पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी दिल्याचे शिंदे यांनी निवेदनात नमूद केले आहे. या संदर्भात विचारणा केली असता, या कथीत मारहाण प्रकरणातील सर्व वैद्यकीय अहवालात कुणालाही गंभीर मारहाण झाल्याचे नमूद करण्यात आले नाही. कुणीही उपचारासाठी दवाखान्यात दाखल नव्हते. त्यामुळे शिंदे यांनी मागणी केलेली भारतीय दंड विधानाची कलमे लावण्यात आलेली नाहीत, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. (वार्ताहर)ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात बावडा पोलीस ठाणे, बारामतीचे उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी पुणे व मुंबईचे धर्मादाय आयुक्त यांच्याकडे अनेक तक्रारी झाल्या आहेत. गुंडशाहीमुळे सामान्य लोक त्यांच्या विरुद्ध तक्रारी देण्यास घाबरतात. पशुहत्याबंदी, दारूबंदीचे शासकीय नियम धाब्यावर बसवले जातात. मनमानी कारभार करून यात्रेकरू, भाविकांना लुबाडले जाते. मारहाण केली जाते. याबाबतचे चित्रीकरण आपल्याकडे असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. आपण व आपली दोन मुले पोलीस खात्यात असताना, जर अमानुष मारहाण होत असेल, तर सामान्यांचे काय होत असेल, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.