शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

डब्बा व्यापा-याची आत्महत्या

By admin | Updated: August 12, 2016 23:30 IST

सट्टेबाजीचा डब्बा फुटल्यामुळे आर्थिक कोंडी झालेल्या दिनेश गोकलानी (वय ३३, रा. क्वेट्टा कॉलनी) नामक डब्बा व्यापा-याने आत्महत्या केली.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 12-  हजारो कोटी रुपयांची सट्टेबाजीचा डब्बा फुटल्यामुळे आर्थिक कोंडी झालेल्या दिनेश गोकलानी (वय ३३, रा. क्वेट्टा कॉलनी) नामक डब्बा व्यापा-याने आत्महत्या केली. शुक्रवारी दुपारी ही खळबळजनक घटना घडली. मात्र, याबाबतची माहिती उघड होऊ नये म्हणून पोलिसांनी रात्रीपर्यंत प्रयत्न केले होते, हे विशेष !देशाच्या अर्थव्यवस्थेला खीळ घालू पाहणारी डब्बा ट्रेडिंगची सट्टेबाजी उघड झाल्यानंतर गुन्हेशाखेने १२ मे २०१६ ला एल-७ समूहासह विविध ठिकाणी धाडी घातल्या होत्या. त्यात गोकलानी बंधूच्या टेलिफोन एक्स्चेंज चौकातील कार्यालयाचाही समावेश होता. या गोरखधंद्याचा सूत्रधार रवी अग्रवाल, वीणा सारडासह दिनेश गोकलानीही फरार होता. तो त्याच्या मित्राच्या नावावर असलेल्या बेसा भागातील गगन अपार्टमेंटमध्ये एका सदनिकेत लपून राहत होता. घरची मंडळी आणि निवडक मित्र त्याला येथेच भेटायला येत होते. त्याच्या सकाळचा चहा, नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण अभिषेक नामक मित्र आणून देत होता. दरम्यान, डब्ब्यात शेकडो कोटी रुपये फसल्यामुळे गोकलानीचा व्यवहार ठप्प झाला होता. त्याच्यावर कर्जाचा डोंगर होता. पैसे मागण्यासाठी गोकलानीच्या घरी अनेक जण चकरा मारत होते. त्याची त्याच्या नातेवाईक आणि मित्रांकडून वेळोवेळी दिनेशला माहिती मिळत होती. कर्जदारांचा तगादा वाढला असतानाच पोलिसांच्या कारवाईचाही धाक असल्याने दिनेशची मानसिक स्थिती बिघडली होती. तो अलिकडे आपली व्यथा मित्रांना बोलूनही दाखवत होता. तर, मित्र आणि नातेवाईक त्याला दिलासा देण्याचा प्रयत्न करीत होते. कोर्टातून जामिन मिळेल, अशीही आशा दाखवत होते. शेवटच्या भेटीत मित्राजवळ रडला ? नेहमीप्रमाणे आज सकाळी अभिषेकने दिनेशला सकाळचा चहा, नाश्ता आणून दिला. त्यावेळी दिनेश त्याच्या मित्राजवळ रडल्याची चर्चा त्याच्या निकटवर्तियातून पुढे आली. त्यावेळी त्याला दिलासा देत अभिषेक निघून गेला. त्यानंतर एका मित्रासह दुपारी दीड ते दोनच्या सुमारास जेवणाचा डब्बा घेऊन आला. नेहमीप्रमाणे त्याने दार ठोठावले. मात्र आतून कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे मित्राने बाजुच्या खिडकीच्या फटीतून डोकावून बघितले असता दिनेश गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला. त्यामुळे या दोघांना जबर हादरा बसला. त्यांनी घरच्यांना कळविले. नंतर पोलिसांना सांगण्यात आले. फरार डब्बा व्यापा-याने आत्महत्या केल्याची वार्ता वरिष्ठ पोलीस अधिका-यांना कळविण्यात आली. त्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. हुडकेश्वर ठाण्यासह मोठा पोलीस ताफा घटनास्थळी पोहचला. दरम्यान, डब्बा व्यापा-याच्या आत्महत्येची वार्ता तातडीने सर्वत्र पोहचू नये म्हणून पोलिसांनी रात्रीपर्यंत खबरदारी घेतली होती.