शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री अंजली श्रीवास्तवची गळफास घेऊन आत्महत्या

By admin | Updated: June 19, 2017 17:51 IST

मुंबईतील मनोरंजन विश्व अजून एका अभिनेत्रीच्या आत्महत्येच्या घटनेने हादरले आहे. नवोदित अभिनेत्री

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - मुंबईतील मनोरंजन विश्व अजून एका अभिनेत्रीच्या आत्महत्येच्या घटनेने हादरले आहे.  नवोदित अभिनेत्री अंजली श्रीवास्तव हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आज उघडकीस आले . अभिनय क्षेत्रात कारकीर्द घडवण्यासाठी धडपडत असलेल्या अंजलीने अंधेरी येथील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवनाचा शेवट केला. 
अंधेरीमधली जुहू परिसराती परिमल सोसायटीत राहणाऱ्या अंजलीला तिचे नातेवाईक वारंवार फोन करत होते. मात्र तिच्याकडून त्यांना कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे चिंतीत झालेल्या तिच्या कुटुंबीयांनी अंजली राहत असलेल्या घराच्या मालकांशी संपर्क साधला. त्यांनी दुसऱ्या चावीने खोलीचा दरवाजा उघडला असता त्यांना अंजलीचा मृतदेह पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.  
हा प्रकार पाहिल्यानंतर घरमालकांनी पोलिसांना खबर दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अंजलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात  पाठवला.  मात्र घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट किंवा अन्य साहित्य हाती लागलेले नाही. त्यामुळे अंजलीच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.