शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिकला पर्याय सुचवा, कोणीही बेरोजगार नाही होणार; एकनाथ शिंदेंचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 06:30 IST

महाराष्ट्र व्यापारी परिषदेत ग्वाही 

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : प्लास्टिकचे दुष्परिणामही आहेत. त्याच्या वापराने कॅन्सर  होत आहेत. शेवटी सरकार सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेऊनच निर्णय घेत असते. मात्र,  प्लास्टिकला पर्याय काय, ते व्यापारी, उद्योजकांनी  सुचवावे. अन्नधान्यावरील जीएसटी व अन्य प्रश्नांवर लवकरच व्यापाऱ्यांची मुंबईत बैठक घेऊ. त्यावर सकारात्मक विचार करून निर्णय घेतला जाईल, आम्हाला कोणाला बेरोजगार करायचे नाही, कोणाचे व्यवसाय बंद पाडायचे नाहीत, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  दिला. 

महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री अँड अँग्रीकल्चर, मराठवाडा चेंबर्स ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्री् व जिल्हा व्यापारी महासंघाच्या संयुक्त विद्यमाने रविवारी ‘महाराष्ट्र व्यापारी परिषद’चे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी व्यापाऱ्यांचे प्रश्न सकारात्मक विचारातून सोडविण्याचे आश्वासन दिले. व्यासपीठावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री खा. रावसाहेब दानवे, आ. संदीपान भुमरे, महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी, वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी, तनसुख झांबड, आदेशपालसिंग छाबडा, सत्यनारायण लाहोटी, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विजय जैस्वाल, उद्योजक घनश्याम गोयल होते. 

मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील व्यापार, उद्योगासाठी पोषक वातावरण तयार करणे व त्याला चालना देण्याचे कार्य हे सरकार करेल. महाराष्ट्र चेंबरने कृषीपूरक उद्योगांच्या विकासासाठी, तसेच राज्यात गुंतवणूक वाढीसाठीही प्रयत्न करावे. महाराष्ट्र चेंबरने दिलेल्या कौशल्य विकासाच्या प्रस्तावाला चालना देण्यात येईल.  

राजकीय बंदमध्ये व्यापारी नसतील  nमहाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी स्पष्ट केले की, यापुढे कोणत्याही राजकीय पक्षाने बंदचे आवाहन केले, तर त्यात व्यापारी सहभागी होणार नाहीत. व्यापाऱ्यांवर आंदोलनाची वेळ आली, तर बंद न पाळता वेगळ्या मार्गाने प्रश्न सोडविणार. nअन्नधान्यावरील जीएसटी निर्णय मागे न घेतल्यास मुंबईत ५० हजार व्यापारी आंदोलन करतील, असा इशारा त्यांनी दिला. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेPlastic banप्लॅस्टिक बंदी