शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
3
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
4
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
5
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
6
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
7
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
8
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
9
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
10
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
11
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
12
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
13
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
14
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
15
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
16
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
17
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
18
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
19
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!

साखरेचा भाव गाठणार पन्नाशी

By admin | Updated: April 20, 2016 06:01 IST

देशात डाळींचे भाव कडाडण्याची स्पष्ट चिन्हे असताना आता साखरेचाही गोडवा कमी होण्याची भीती आहे. भारताच्या साखर उत्पादनात यंदा मोठी घट असून

सुरेश भटेवरा,  नवी दिल्ली देशात डाळींचे भाव कडाडण्याची स्पष्ट चिन्हे असताना आता साखरेचाही गोडवा कमी होण्याची भीती आहे. भारताच्या साखर उत्पादनात यंदा मोठी घट असून, त्यामुळे साखरेचे भाव प्रति किलो ५० रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. सध्या साखर साधारणत: ४0 रुपये किलोने मिळत असून, महिनाभरात हा भाव सरासरी १० रुपयांनी वाढेल, अशी शक्यता आहे. महाराष्ट्रात यंदाच्या एफआरपीनुसार ऊस उत्पादकाला साधारणत: २००० ते २४00 रुपये प्रति टन भाव मिळाला. ग्राहकांना सध्या ४0 रुपये किलोने साखर मिळते आहे. कमी उत्पादनामुळे साखरेचे भाव वाढल्यास त्यास सरकारचे धरसोडीचे धोरण जबाबदार असेल, अशी टीका लातूरच्या मांजरा सहकारी साखर कारखाना परिवारातील ५ साखर कारखान्यांचे संचालन करणारे आमदार अमित देशमुख यांनी केली. भारतात दरवर्षी साखरेचा खप २२५ लाख टन असला तरी त्यातली ७0 ते ८0 टक्के साखर आइसक्रीम, चॉकलेट्स, मिठाई, कोल्ड्रिंक्स कारखान्यांमध्ये वापरली जाते. ग्राहकांच्या थेट वापराचे साखरेचे प्रमाण २0 ते ३0 टक्के आहे. ही तफावत लक्षात घेता सरकारने कारखान्यांना त्याचा भार उचलावयास भाग पाडले पाहिजे, अशी मागणीही आ. देशमुख यांनी केली. राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने साखरेसाठी स्टॉक लिमिट ठरवले होते. आता साखरेवरील स्टॉक लिमिट सरकारने काढून टाकले असल्याने साठेबाजीवर नियंत्रण कसे घालणार, हा मोठा प्रश्न आहे.