शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

साखर कारखानदारांनो सावधान : वजनकाट्यांची होणार तपासणी, स्वतंत्र पथकाची नियुक्ती, अचानक पडणार धाडी

By admin | Updated: June 19, 2017 17:09 IST

-

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १९ : यंदाच्या गळीत हंगामात साखर कारखान्यांच्या वजनकाट्यांची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र पथकाची नियुक्ती केली असून, हे पथक अचानक धाडी टाकेल़ त्यामुळे कारखानदारांनी सावधगिरी बाळगावी, असा इशारा राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी कारखान्यांना दिला. रविवारी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले,उसाच्या सदोष वजनकाट्याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. अनेक कारखानदारांविरोधात अशा नेहमीच तक्रारी येत आहेत. कारखान्यांचे वजनकाटे आॅनलाईन करण्याबाबत शेतकरी संघटनेच्या तक्रारी आहेत. कारखानदारांविरोधात अशा नेहमीच तक्रारी येत आहेत. शेतकरी संघटनेने कारखान्यांचे वजनकाटे आॅनलाईन करण्याबाबत सातत्याने पाठपुरावा केला आहे मात्र यंदा ही बाब शक्य नाही असे त्यांनी स्पष्ट केले.ऊस उत्पादकांची वजनात फसगत होऊ नये यासाठी यंदा सरकारने वजनकाट्यांची तपासणी पथकाची नियुक्ती केली आहे. या पथकाच्या हाती बंद लखोटा देण्यात येईल. कोणत्या कारखान्यांची तपासणी करायची हे ऐनवेळी लखोटा फोडल्यानंतरच त्यांना कळेल. अचानक धाडी टकून अशा संशयास्पद वजनकाट्यांची तपासणी करुन तातडीने अहवाल देणे अपेक्षित आहे. वजनकाट्यात दोष आढळल्यास कारखान्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा सहकारमंत्र्यांनी दिला. चुकीचे काही कराल तर अंगलट येईल, असेही त्यांनी कारखानदारांना सुनावले.यंदाच्या गाळप हंगामापासून साखर कारखान्यांना आॅनलाईन पद्धतीने गाळप परवाने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कारखान्यांकडून आॅनलाईन प्रस्ताव प्राप्त होताच १५ दिवसांत त्यांना परवाने दिले जातील. मात्र तत्पूर्वी गळीत हंगामाआधी संबंधित कारखान्यांनी शासकीय देणी, शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम थकवली नाही ना ? याची खातरजमा केली जाईल. ऐन गळीत हंगामात परवान्यासाठी साखर कारखान्यांना वेठीस धरण्याचा प्रकार होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.---------------------ऊस तोडणी यंत्रणांना प्रोत्साहनऊस तोडणी मंत्र्यांबाबत शासनाने यंदा नवीन धोरण अवलंबले आहे. तोडणी मजुरांची कमतरता लक्षात घेता शासनाने तोडणी यंत्रांच्या किमतीच्या ४० टक्के अथवा कमाल ७० लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. साखर कारखान्यांनी या निर्णयाचा लाभ घेण्याचे आवाहन सहकारमंत्र्यांनी केले.