शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

राजीनामा मागण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना - सुधीर मुनगंटीवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2018 06:25 IST

यवतमाळ जिल्ह्यात वनविभागाने ठार मारलेल्या ‘टी-१ अवनी’ या वाघिणीच्या मृत्यूवरून भाजपाच्या दोन मंत्र्यांमध्ये आता चांगलीच जुंपली आहे.

मुंबई  - यवतमाळ जिल्ह्यात वनविभागाने ठार मारलेल्या ‘टी-१ अवनी’ या वाघिणीच्या मृत्यूवरून भाजपाच्या दोन मंत्र्यांमध्ये आता चांगलीच जुंपली आहे. वनखात्याला वाघिणीला ठार मारण्याची हौस नव्हती, असे सांगत माझा राजीनामा मागण्याचा अधिकार फक्त पक्षाध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच आहे, असा टोला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांना लगावला आहे.वाघिणीला ठार न मारता तिला जिवंत पकडता येऊ शकले असते. पण वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उताविळपणामुळे तिचा नाहक बळी गेल्याचा आरोप करत, मुनगंटीवार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केल्याचे वृत्त आहे. हे प्रकरण आपण पक्षीय पातळीवर उपस्थित करू, असेही मनेका यांनी म्हटले आहे.यावर वनमंत्री मुनगंटीवार म्हणाले, मनेका गांधी यांना माझा राजीनामा मागण्याचा काहीच अधिकार नाही. तो अधिकार पक्षाध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांना आहे. १३ जणांचे बळी घेणाऱ्या वाघिणीला पकडण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न वनखात्याने केले होते. मात्र, तिला जेरबंद करताना हल्ला केल्याने गोळी घातली गेली, असे स्पष्टीकरण वनमंत्र्यांनी दिले.मनेका गांधींच्या मतदारसंघातही वाघाला मारण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी या घटनेची पूर्ण माहिती घेऊन बोलावे आणि कुपोषित बालकांच्या पालनपोषणाकडे जरा लक्ष द्यावे, असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला.‘बिर्ला-अंबानी’साठी वाघिणीची शिकारबिर्ला आणि अंबानी यांच्या उद्योगांसाठीच सरकारने अवनी वाघिणीची शिकार केल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. वन्य कायद्यानुसार एखादा वन्य प्राणी हिंसक झाला तर त्याला बेशुद्ध करून पकडणे असा नियम आहे. अवनीच्या बाबतीत मात्र सगळे नियम धाब्यावर बसवण्यात आले. अवनीला बेशुद्ध करण्याऐवजी थेट ठार करण्यात आलं ही बाब निषेधार्ह आहे, असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे. मात्र, पाटील यांचा हा आरोप मुनगंटीवार यांनी खोडून काढला आहे.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार