शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

कोणत्याही क्षणी 'गोड' बातमी; सुधीर मुनगंटीवार प्रचंड आशावादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 20:00 IST

करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांच्या मुलाचे लग्न काल माढ्यात पार पडले.

मुंबईः करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांच्या मुलाचे लग्न काल माढ्यात पार पडले. या निमित्ताने अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र आले होते. त्याच पार्श्वभूमीवर राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे सुधीर मुनगंटीवारांनी पुन्हा एकदा गोड बातमी येणार असल्याचं टीवी 9ला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटल्यानं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. लवकरच गोड बातमी महाराष्ट्रापर्यंत पोहोचणार आहे. कोणत्याही दिवशी, कोणत्याही महिन्यात ती येऊ शकते. आजची अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट म्हणजे सरकारला कोणत्याही क्षणी स्थगिती मिळू शकते, असे सूतोवाचही मुनगंटीवारांनी केले आहेत. तर त्यांनी महाराष्ट्र विकास आघाडीचाही खरपूस समाचार घेतला आहे. या युतीचा जन्मच मुळात कामाच्या आधारावर किंवा विकासाच्या नावावर झालेला नाही. महाराष्ट्र विकास आघाडीचा जन्म सत्तेच्या महत्त्वाकांक्षेपायी झाला आहे. महाराष्ट्र आघाडीचा जन्म जनादेशाचा अवमान करत, महाराष्ट्राचा अपमान करत झालेला आहे, असं म्हणत मुनगंटीवारांनी टीकास्त्र सोडलं आहे. खातेवाटप हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, मुख्यमंत्र्यांचा तो अधिकार आहे. सरकार स्थापन करायला उशीर, कामाची सुरुवात व्हायला उशीर, मला वाटतं की चिऊताई चिऊताई दार उघडची कथाच संपून जाईल आणि म्हणून आमच्या सदिच्छा आहेत, असा उपरोधिक टोलाही त्यांनी शिवसेनेला लगावला आहे.

खडसेंच्या बंडावर ते म्हणाले, खडसे, बावनकुळे, तावडे, मेहताजी असतील हे भाजपाचे सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. ज्यांच्यासोबत मी काम केलेलं आहे. त्यांनी आयुष्यभर भाजपाच्या विस्तारासाठी, पक्षवाढीसाठी जिवाचं रान केलं आहे. काही गोष्टींच्या संदर्भात नाराजी असेल, तर ती दूर करण्याचाच प्रयत्न होईल, असंही ते म्हणाले आहेत.  

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी