ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १४ - दक्षिण मुंबईतील काळबादेवी परिसरातील शनिवारी लागलेल्या भीषण आगीत जखमी झालेल्या आणखी एका अधिका-याला आज आपले प्राण गमवावे लागले. या आगीत ९० टक्के जखमी झालेले अग्निशमन दलाचे अधिकारी सुधीर अमीन यांचे आज दुर्दैवी निधन झाले. त्यांच्यावर ऐरोलीतील बर्न रुग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या सहा दिवसांपासून ते मृत्यूशी झुंज देत होते, मात्र अखेर आज त्यांचे निधन झाल्याने त्यांची झुंज अपयशी ठरली.
यापूर्वी अग्निशामक दलाचे सहाय्यक विभागीय अधिकारी एस. डब्ल्यू. राणे व केंद्र अधिकारी एम. एन. देसाई हे ढिगाऱ्याखाली सापडून मृत्युमुखी पडले होते. त्यांच्या मृत्यूचे दु:ख ताजे असतानाचा आज अमीन यांचेही निधन झाल्याने अग्निशमन दलावर शोककळा पसरली आहे.