शहरं
Join us  
Trending Stories
1
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
3
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
4
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
5
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
6
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
7
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", फातिमा सना शेखसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
9
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
10
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
11
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
12
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
13
विधिमंडळाची ही आचारसंहिता; पण आमदार तसे वागतात का?
14
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
15
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
16
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
17
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
18
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
19
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
20
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात

पोटाची खळगी भरण्यासाठी धावपळ करणाऱ्या वृध्देचे असेही पक्षीप्रेम

By admin | Updated: March 8, 2017 11:49 IST

अन्न-पाण्याविना होरपळणारे जीव, छोटे प्राणी व पक्षी बघून मन हेलावून गेलेल्या ६० वर्षीय सुंदराबाई महादेव कातडे यांचे पक्षीप्रेम सर्वत्र कौतूकाचा विषय ठरत आहे.

नंदकिशोर नारे, ऑनलाइन लोकमत

वाशिम,दि. ८ - अन्न-पाण्याविना होरपळणारे जीव, छोटे प्राणी व पक्षी बघून मन हेलावून गेलेल्या व स्वताच्या कुटुंबाचीच पोटाची खळगी भरण्यासाठी धावपळ करावी लागणाऱ्या ६० वर्षिय सुंदराबाई महादेव कातडे यांचे पक्षीप्रेम सर्वत्र कौतूकाचा विषय ठरत आहे. गत सात वर्षांपासून सुरू केलेल्या पक्ष्यांसाठीच्या पाणवठे व अन्नछत्रामुळे अनेक पक्षी आपली तहान व भूक भागवितांना दिसून येत आहेत. मंगरूळपीर तालुक्यात कंझरा नावाचे एक छोटेसे गाव. या गावात सुंदराबाई महादेव कातडे यांचे कुटुंब वास्तव्यास असून केवळ एक एकर शेतीवर आपल्या चार सदस्स्य असलेल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्या करतात. दिवसभर मेहनत करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करून आपला संसार गाडा चालवितात. मात्र अन्न पाण्याविना होरपळणाऱ्या छोटया छोटया जिवाचे हाल न बघविल्याने सुंदराबाईने आपल्या घराजवळच असलेल्या एका झाडावर सर्व दिशेने जिथे जागा दिसेल तेथे पक्ष्यांसाठी पानवठे व अन्नछत्र उभारले. सुरूवातील एकट-दुक्कट पक्षी यायचे. आजची परिस्थिती पूर्णपणे बदलली असून काही पक्ष्यांनी तेथे स्वताचे घरटेच निर्माण केलेले दिसून येत आहेत. ज्याप्रमाणे मनुष्याची दिनचर्या असते त्याचप्रमाणे या झाडावर पशुपश्यांची दिनचर्या दिसून येते. सकाळच्यावेळी सर्वत्र पक्ष्यांच्या किलबिलाट दिसून येतो. सुंदराबाई आपल्या दैनदिन जीवनाची सुरूवात स्वता पशुपक्ष्यांच्यासेवेपासून करताना दिसून येत आहेत. सकाळी उठल्याबरोबर पक्ष्यांसाठी उभारण्यात आलेल्या पाणपोईमध्ये पाणी भरणे, त्यांच्या खायाची व्यवस्था करणे व यानंतर आपल्या कामास सुरूवात करण्याचा दिनक्रम सुंदरबाई यांनी हाती घेतला आहे. मुले भाजीपाल्याचा व्यवसाय करीत असून ते सकाळीच आपल्या व्यवसायात मग्न होवून जातात. पोटासाठी वणवण फिरणारे कातडे कुटुंबिय मात्र दिवसेंदिवस कमी होत चाललेल्या पशुपक्ष्यांना वाचविण्यासाठी धडपड करीत आहेत. वाढते प्रदूषण, मोबाईलच्या ध्वनीलहरी, विषारी किटकनाशक, सिमेंटच्या घरांमुळे चिमण्या व इतर छोटे पक्षी दुरापास्त होण्याच्या मार्गावर आहेत. यातकंझरा येथील सुंदराबाई कातडे यांनी पशु-पक्ष्यांच्या तृष्णा व क्षुधा प्राप्तीसाठी सुरू केलेल पानवठे व अन्नछत्र तयार करून आपल्या आगळया-चेगळया भुतदयेचा परिचय दिला.