शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या बुडणाऱ्या बोटीला वाचविण्यात यश; ‘अशोका’च्या मदतीला ‘लक्ष्मीप्रसाद’ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 05:56 IST

पालघर पोलिस विभागाची समुद्रात पेट्रोलिंगसाठी गेलेली ‘अशोका’ बोट दुपारी साडेतीन वाजता समुद्रात निर्माण झालेल्या वादळी वारे आणि तुफानी लाटांमध्ये सापडली.

हितेन नाईकपालघर :

पालघर पोलिस विभागाची समुद्रात पेट्रोलिंगसाठी गेलेली ‘अशोका’ बोट दुपारी साडेतीन वाजता समुद्रात निर्माण झालेल्या वादळी वारे आणि तुफानी लाटांमध्ये सापडली. या बुडणाऱ्या बोटीला केळवे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांनी स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने समुद्रात जाऊन सुखरूप किनाऱ्यावर आणले. 

समुद्रात केळवे ते दातिवरे या भागात पेट्रोलिंग करण्यासाठी गेलेली ‘अशोका’ बोट दातिवरे गावासमोर समुद्रात ७ नॉटिकल भागात गेली. तेव्हा बोटीत हळूहळू पाणी शिरत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिस कर्मचाऱ्यांनी पिण्याच्या पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्या कापून त्याद्वारे बोटीत शिरलेले पाणी काढण्यास सुरुवात केली. स्पीड बोटीतून त्यांचे लाइफ जॅकेटसह अन्य साहित्य वाहून गेले होते. बोटीतील एका अधिकाऱ्याने सहायक पोलिस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांच्या मोबाइलवर संपर्क साधला. गायकवाड यांनी कॉन्स्टेबल जयदीप सांबरे, वसंत वळवी, पी. सी. साळुंखे तसेच मच्छीमार हर्षल मेहेर, राकेश मेहर, आतिश मेहेर, रितेश मेहेर, चंद्रकांत तांडेल आणि रुपेश बंगारा यांना साेबत घेत ‘लक्ष्मीप्रसाद’ बोट समुद्रात रवाना झाली. सुटकेचा निःश्वास  समुद्रात वादळी वारे आणि लाटा उसळत असताना मच्छिमारांनी तासभर प्रवास करत बोटीचा शोध घेतला. समुद्रात भरती असल्याने बोट भरतीच्या प्रवाहाने दातिवरे गावाकडून टेंभी गावाच्या समोर वाहत आली होती. यावेळी मदतीसाठी पोलिसांची आणखी एक बोट आल्यानंतर ‘अशोका’ बोटीतील पोलिसांनी सुटकेचा निःश्वास टाकला. सर्वांच्या मदतीने बोटीतील पाणी बाहेर काढण्यात यश मिळाले.