शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेला डावलून लेखानुदान मंजूर

By admin | Updated: March 25, 2017 02:31 IST

अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेत शिवसेना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय काढणार, अशी कुणकुण लागल्याने शिवसेनेला डावलून लेखानुदान मंजूर करण्यात आले.

मुंबई : अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेत शिवसेना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय काढणार, अशी कुणकुण लागल्याने शिवसेनेला डावलून लेखानुदान मंजूर करण्यात आले.अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चा ‘आॅन लेग’ होती. शिवसेनेचे विजय औटी आणि जयप्रकाश मुंदडा यांना त्यावर बोलायचे होते. बोलण्यासाठी त्यांनी हातही वर केले, पण तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी ‘चर्चा संपली’ असे जाहीर करून, लगेच २०१७-१८चे लेखानुदानही मंजूर करून घेतले. त्यामुळे संतप्त झालेले विजय औटी यांनी ‘काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत आम्हालाही दाबता का,’ असा सवाल केला. त्यावर विभागवार चर्चेत तुम्ही काय बोलायचे ते बोला, असे उत्तर संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी औटी यांना दिले. सरकारने दडपशाही सुरू केली आहे, यांना चर्चा नको आहे, त्यामुळे अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चादेखील या सरकारने गुंडाळून टाकली, असा आरोप विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केला. सरकारने आता शिवेसेनेवरही दडपशाही सुरू केल्याचे ते म्हणाले. १९ आमदारांच्या निलंबनावरून काँग्रेस, राष्ट्रवादीने सभागृहात बुधवारपासून बहिष्कार टाकला आहे. मात्र, विधानसभेत अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चा सुरू होती. भाजपाचे राजेंद्र पाटणी त्यावर बोलत होते, पण त्यांना ‘आॅनलेग’ ठेवले गेले. कामकाज संपल्यानंतर भाजपातर्फे कोणालाही बोलायचे नाही, असे सांगण्यात आले आणि सर्वसाधारण चर्चा संपवली गेली. अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेत कोणत्याही विषयावर बोलता येते, त्यासाठी विभागाचे किंवा विशिष्ट क्रमांकाच्या मागण्यांवर बोलण्याचे बंधन नसते. या चर्चेला अर्थमंत्री उत्तर देत असतात, तर विभागवार चर्चेला त्या-त्या विभागाचे मंत्री उत्तर देत असतात. त्यामुळे या चर्चेत जर कर्जमाफीचा विषय शिवसेनेने काढला असता, तर अर्थमंत्र्यांना त्यावर बोलावे लागले असते. (विशेष प्रतिनिधी)