शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

दूध भुकटीसाठी अनुदान, राज्य शासनाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 05:19 IST

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या दालनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दूध भुकटी निर्यातीला अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला.

नागपूर - दूध भुकटीची निर्यात करणाऱ्या उत्पादकांना प्रति किलो ५० रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येईल तसेच दूध निर्यात करणा-यांनाही प्रति लीटर ५ रुपये प्रोत्साहनपर अनुदान पुढच्या दोन महिन्यांसाठी देण्यात येईल, असा निर्णय राज्य सरकारने मंगळवारी घेतला. तशी माहिती पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी विधानसभेत दिली.विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या दालनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दूध भुकटी निर्यातीला अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासोबतच दुधाच्या उपपदार्थांना अधिक मागणी येण्याच्या दृष्टीने तूप आणि लोणी यावरील जीएसटी कमी करण्यात यावा, अशी शिफारस केंद्र सरकारला करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या बैठकीस मंत्री जानकर यांच्यासह महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे, दिवाकर रावते, एकनाथ शिंदे, सदाभाऊ खोत यांच्यासह विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार, शरद रणपिसे, गणपतराव देशमुख, राजेश टोपे, मधुकर चव्हाण, हसन मुश्रीफ, सुरेश धस, चंद्रदीप नरके, राहुल मोटे, सत्यजीत पाटील, मनोहर भोईर, मंदाकिनी खडसे आणि महानंदचे अध्यक्ष उपस्थित होते.पोषण आहारातही दूध व दूध भुकटीचा समावेशउपरोक्त निर्णयासोबतच शालेय शिक्षण विभाग, महिला व बाल कल्याण विभाग, आदिवासी विकास विभाग आणि सामाजिक न्याय विभाग या विभागांमार्फत राबविण्यात येणाºया विविध पोषण आहार योजनांमध्ये दूध किंवा दूध भुकटीचा समावेश करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात आल्याचे जानकर यांनी सांगितले.दृष्टिक्षेपात पावडरदेशात शिल्लक पावडर ३.५०लाखटन‘अमूल’कडे शिल्लक ६० हजारटन‘गोकूळ’कडे शिल्लक ७ हजारटनआंतरराष्टÑीय पातळीवर ११५ रुपयेपावडरचे दर प्रतिकिलोसरकारचे निर्यात ५० रुपयेअनुदान प्रतिकिलोपावडर निर्यातअनुदानाचे गणितपावडरचा उत्पादन खर्च १६० रुपयेप्रतिकिलोदेशांतर्गत पावडर दर १२५ रुपयेप्रतिकिलोआंतरराष्टÑीय पातळीवर ११५ रुपयेप्रतिकिलोसरकारचे अनुदान ५० रुपये

टॅग्स :milkदूधGovernmentसरकार