पुणे : महाराष्ट्र ओनरशीप फ्लॅट्स अॅक्टनुसार प्राप्त होणाऱ्या तक्रारी दाखल करून घेत त्यावर कायदेशीर कारवाई करावी, असे परिपत्रक पोलीस महासंचालक कार्यालयाने काढले आहे. राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) यांनी राज्यातील सर्व आयुक्त, अधीक्षक यांना हे परिपत्रक पाठवले आहे. राज्य शासनाने ‘महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट्स रेग्युलेशन आॅफ प्रमोशन आॅफ कन्स्ट्रक्शन, सेल मॅनेजमेंट अॅन्ड ट्रान्सफर अॅक्ट १९६३’ (मोफा) हा कायदा, तसेच महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना कायदा १९६६ (एमआरटीपी) मंजूर केलेला आहे. बांधकाम व्यावसायिकाने फ्लॅटचा ताबा ठरलेल्या तारखेला दिला नाही किंवा ताबा देण्यापूर्वी भोगवटापत्र प्राप्त करून दिले नाही, तर या कायद्यानुसार कारवाई केली जावू शकते. महापालिकेचे मान्य नकाशे बांधकाम ठिकाणी प्रदर्शित करणे बंधनकारक आहे. (प्रतिनिधी)
बिल्डरांविरुद्ध फसवणुकीच्या तक्रारी दाखल करून घ्या
By admin | Updated: July 4, 2016 02:03 IST