शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो-१ माहिती अधिकाराच्या कक्षेत

By admin | Updated: April 27, 2015 05:33 IST

महानगरातील दळणवळण व्यवस्थेतील महत्त्वाचे साधन म्हणून पुढे येत असलेल्या मुंबई मेट्रो-१ मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे.

जमीर काझी, मुंबईमहानगरातील दळणवळण व्यवस्थेतील महत्त्वाचे साधन म्हणून पुढे येत असलेल्या मुंबई मेट्रो-१ मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. यापुढे अन्य शासकीय व निमशासकीय कार्यालयांप्रमाणेच या प्रकल्पाच्या व्यवहारातील इत्यंभूत अधिकृत माहिती उपलब्ध करता येणार आहे. मेट्रो-१ आता माहिती अधिकाराच्या कक्षेत आली आहे. सार्वजनिक खासगी सहभागातून (पीपीपी) कार्यान्वित मेट्रो-१ ही जनप्राधिकरण (पब्लिक आॅथॉरिटी) आहे. त्याबाबतचा दावा मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला (एमएमओपीएल) मान्य करावा लागला आहे. माहिती अधिकार कायद्यान्वये माहिती पुरविण्यासाठी त्यांनी माहिती अधिकारी व प्रथम अपिल अधिकाऱ्यांची यादी कंपनीच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केलेली आहे. गेल्या दहा महिन्यांपासून वर्सोवा ते घाटकोपर या ११.४० किलोमीटर मार्गावर धावणारी मेट्रो-१ जनप्राधिकरणाच्या अंतर्गत येत नसल्याचा दावा सुरुवातीला एमएमआरडीए व एमएमओपीएलकडून करण्यात आला. मात्र राज्य माहिती आयुक्तांनी हा प्रकल्प पब्लिक अ‍ॅथॉरिटी असल्याचा निकाल दिला. माजी केंद्रीय माहिती आयुक्त शैलेश गांधी यांनी केलेल्या तक्रारीनुसार माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड व मुंबई विभागाचे आयुक्त अजितकुमार जैन यांनी १९ मार्चला त्याबाबत एमएमओपीएलला आदेश दिले. मेट्रो-१ च्या सुरक्षेबाबत रेल्वे आयुक्तांनी दिलेल्या अहवालाची मागणी केली असता हे माहिती अधिकार अधिनियम कायद्यांतर्गत येत नसल्याचे सांगत माहिती देण्यास नकार दिला होता. त्यामुळे गांधी यांनी राज्य माहिती आयुक्ताकडे त्याबाबत धाव घेतली होती. आरटीआयच्या सेक्शन ४ अंतर्गत जनप्राधिकरणाने नागरिकांसाठी उपयुक्त ठरणारी माहिती स्वत:हून सादर करावयास हवी, असा त्यांनी दावा केलेला होता.