शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

ऊसदराचा प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवू- सुभाष देशमुख

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2017 16:20 IST

मुंबई : ऊसदरावरून शेवगाव येथे झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उग्र आंदोलन करू नका, शांततेच्या मार्गाने ऊसदराचा प्रश्न सोडवू, असे आवाहन ऊस उत्पादक शेतकरी आणि शेतकरी संघटनांना सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी बुधवारी केले.

मुंबई : ऊसदरावरून शेवगाव येथे झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उग्र आंदोलन करू नका, शांततेच्या मार्गाने ऊसदराचा प्रश्न सोडवू, असे आवाहन ऊस उत्पादक शेतकरी आणि शेतकरी संघटनांना सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी बुधवारी केले. ते मंत्रालयात पत्रकारांशी बोलत होते.यावेळी ते पुढे म्हणाले की, गेल्या वर्षीपेक्षा केंद्र सरकारने यावर्षी एफआरपीत अडीचशे रुपयांची वाढ केली आहे. राज्य सरकारचीही भूमिका ठाम आहे. साखर कारखान्यांनी एफआरपी दिलाच पाहिजे. एफआरपी देणे सर्वांना बंधनकारक आहे. जे साखर कारखाने एफआरपीनुसार दर देणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यावर सरकार ठाम आहे.कोल्हापूरच्या बैठकीत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेऊन ऊसदराचा फॉर्म्युला ठरवला आहे. पुण्यामध्येही अशीच बैठक झाली. ऊसाबाबत राज्यबंदी उठवावी अशी मागणी होती, ती मान्य केली आहे. ऊसदराच्या बाबतीत झोनबंदीसुद्धा उठवली आहे. ऊसदरासंदर्भात साखर कारखान्यांना विविध सूचना दिल्या आहेत.साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत संशय व्यक्त होत होता, त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली भरारी पथक तयार केले आहे. जिथे संशय आहे, तक्रारी आहेत त्या ठिकाणी नियमित तपासणी सुरू आहे. त्यामुळे ऊसदराचा प्रश्नही चर्चेने सोडवला जाईल. सर्वांना विनंती आहे की, चर्चा करून निर्णय घ्यावा. जाळपोळ करुन राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करु नये. टायर फोडून शेतकऱ्यांचे नुकसान करु नका. शांततेच्या मार्गाने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. आंदोलनाचा फटका सर्वांनाच बसतो असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. नगर जिल्ह्यातील शेवगाव येथे झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मंत्री देशमुख यांनी हे शेतकरी संघटना आणि ऊस उत्पादकांना आवाहन केले आहे.नोव्हेंबरअखेर ८० टक्के शेतकऱ्यांची कर्जमाफी होईलदरम्यान, राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी कर्जमाफी योजनेबाबत बोलताना ते म्हणाले, राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीची अंमलबजावणी सुरू आहे. कर्जमाफीच्या निकषात बसणारा २००९ पासूनचा कोणताही शेतकरी योजनेपासून वंचित राहणार नाही. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २५ नोव्हेंबरपर्यंत कर्जमाफी मिळेल असे वाटत नाही असे वक्तव्य केले आहे. त्यासंदर्भात देशमुख म्हणाले, अजितदादांच्या काळात बँकेकडून घेतलेल्या माहितीच्या आधारे कर्जमाफी करण्यात आली. त्या कर्जमाफीला दहा महिने लागले होते. पण आमचे सरकार गतिमान आहे, नवीन तंत्रज्ञान वापरून लवकरात लवकर कर्जमाफीची अंमलबजावणी करणार आहोत. जे होऊ शकत नाही ते करून दाखविण्याचे काम सरकार करील. कर्जमाफीचा लाभ आतापर्यंत राज्यातील ५५ हजार शेतकऱ्यांना झाला असून, त्यांच्या खात्यांवर सुमारे ३७० कोटी रुपये जमा झाले आहेत. तसेच येत्या नोव्हेंबरअखेर ८० टक्के शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल, असा दावाही देशमुख यांनी यावेळी केला.

टॅग्स :Mumbaiमुंबई