नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजून जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची नियुक्ती केलेली नाही. चालू महिनाअखेर किंवा जास्तीत जास्त जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ही नियुक्ती होण्याची शक्यता आहे. मुंबई शहराचे पालकमंत्रिपद शिवसेनेला तर उपनगराचे भाजपाला दिले जाईल, अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपातर्फे गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांना संधी मिळेल, असे सूत्रांनी सांगितले. जळगावचे पालकमंत्रिपद एकनाथ खडसे यांना, तर याच जिल्ह्याचे असलेले जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना नाशिकचे पालकमंत्रिपद दिले जाऊ शकते. मुख्यमंत्री फडणवीस हे पालकमंत्री ठरविण्यासाठी येत्या तीन-चार दिवसांत शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. (प्रतिनिधी)
उपनगराचे पालकमंत्रिपद भाजपाकडे ?
By admin | Updated: December 22, 2014 03:59 IST