कडोळी (जि. हिंगोली) : गरिबीमुळे वह्या-पुस्तके घेण्यास वडिलांकडून नकार मिळाल्याने निराश झालेल्या एका १६ वर्षीय मुलाने शेतात जाऊन गळफास घेतला. ही घटना सेनगाव तालुक्यातील माझोड येथे गुरुवारी सकाळी घडली.कृष्णा पालकनाथ जाधव असे मृताचे नाव आहे. त्याचे आई-वडील मजुरी करतात. न्यू हायस्कूल शाळेत इयत्ता दहावीत शिकणाºया कृष्णाने वडिलांकडे वह्या-पुस्तकांची मागणी केली होती. मात्र पैसे नसल्याचे वडिलांनी सांगितल्याने त्याने शाळेत जाण्यास नकार दिला. त्यावरून पालकनाथ जाधव हे त्याच्यावर रागावले होते. त्यामुळे निराश झालेल्या कृष्णाने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
शिक्षणासाठी पैसे नसल्याने मुलाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 03:55 IST