शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

यंदाही विद्यार्थ्यांची फार्मसीलाच पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 04:46 IST

राज्यातील आकडेवारी; अभियांत्रिकीच्या जागा पुन्हा माेठ्या प्रमाणात रिक्त

मुंबई : राज्यातील अभियांत्रिकी, फार्मसी या व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून, राज्यात अजूनही अभियांत्रिकीकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याचे रिक्त जागांवरून दिसत आहे. यंदा अभियांत्रिकीच्या राज्यात तब्बल ५५,४४४ जागा रिक्त राहिल्या, तर फार्मसीच्या केवळ १,७२९ जागांवर प्रवेश झाले नसल्याची माहिती आहे. राज्यातील पदवी अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांच्या शासकीय संस्थांमधील बहुतांश जागा भरल्या आहेत. मात्र, विनाअनुदानित संस्थांमध्ये निम्म्याहून अधिक जागा रिक्त असून, वर्ग ओस पडले आहेत. राज्यभरातील ३३१ संस्थांमध्ये यावर्षी १ लाख २३  हजार ८९५ जागा होत्या. जागा रिक्‍त राहण्याचे प्रमाण ४४.७५ टक्के आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत हे प्रमाण ४ टक्क्यांनी कमी झाले आहे, यंदा मुळातच अभियांत्रिकीच्या जागा घटल्याने ही रिक्त जागांची संख्या कमी झाल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान, राज्यात फार्मसीच्या ३२१ संस्थांमध्ये २५,३२७ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी २३,६४१ जागांवर प्रवेश निश्चित झाले आहेत. म्हणजे फक्त ६.८२ टक्के जागा रिक्त आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फार्मसी (औषधनिर्माण शास्त्र) आणि संबंधित क्षेत्रातील रोजगाराला पर्यायाने अभ्यासक्रमाला मागणी वाढल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.पदवीप्रमाणे अभियांत्रिकी पदव्युत्तर अभ्यासक्रमाकडेही विद्यार्थ्यांनी फिरवली पाठ एम. ई. (अभियांत्रिकी पदव्युत्तर)च्या असलेल्या १९६ संस्थांत १२,४५६ इतक्या जागा होत्या. त्यापैकी ५,५७९ जागांवर प्रवेश झाले. रिक्‍त जागा राहण्याची टक्केवारी ५५.२१  टक्के आहे. पदवीप्रमाणे अभियांत्रिकी पदव्युत्तरची मागणीही विद्यार्थ्यांकडून कमी होत असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे फार्मसी पदव्युत्तरच्या २० टक्के जागा राज्यात रिक्त राहिल्या आहेत. राज्यातील ११३ संस्थांमध्ये फार्मसीच्या ३,२०० जागा उपलब्ध होत्या, त्यापैकी २,५५८ जागा भरल्या असून, ६४२ जागा रिक्त राहिल्या आहेत.