शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

फोटोशूटसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना चाकूने भोसकून लुटारू फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2016 15:42 IST

निर्जन ठिकाणी फोटोशूटसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना लुटण्याच्या प्रयत्नात लुटारूंनी चाकूहल्ला केला. त्यामुळे एक विद्यार्थी जबर जखमी

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 24 -  निर्जन ठिकाणी फोटोशूटसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना लुटण्याच्या प्रयत्नात लुटारूंनी चाकूहल्ला केला. त्यामुळे एक विद्यार्थी जबर जखमी झाला. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी ही घटना घडली. 

प्रज्वल हेमराज बांते (वय १८) असे जखमी विद्यार्थ्याचे नाव असून, तो अभियांत्रिकीचा प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे. व्यंकटेशनगरात राहणारा प्रज्वल आणि त्याच्या मित्रांनी एक दिवसापूर्वी स्वत:चे फोटो काढण्याची योजना बनविली. त्यासाठी ते रविवारी दुपारी नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिडगावकडे निघाले. रस्त्याच्या कडेला मनासारखा ‘स्पॉट‘ दिसल्याने त्यांनी स्वत:चे फोटो काढणे सुरू केले. तेवढ्यात तरोडी गावाकडून बजाज अ‍ॅव्हेंजर (एमएच ४९/ टीसी ०४९) दुचाकीवर दोन आरोपी आले. त्यांनी प्रज्वल आणि त्याच्या मित्रांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या जवळचा २५ हजार किंमतीचा कॅमेरा हिसकावून घेतला. मोबाईल आणि खिशातील रक्कमही काढू लागले. त्यामुळे प्रज्वलने लुटारूंना विरोध केला. तो प्रतिकार करीत असल्यामुळे एका आरोपीने त्याच्या डोक्यावर दगड मारला. तर, दुस-याने त्याच्या पोटावर चाकूचा घाव मारला. यानंतर शिवीगाळ करीत आरोपी पळून गेले. जखमी प्रज्वलला त्याच्या मित्रांनी रुग्णालयात दाखल केल्यानंतर नंदनवन पोलिसांना माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक सयाम यांनी प्रज्वलच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. आरोपीच्या दुचाकीचा क्रमांक मिळाल्यामुळे पोलिसांनी आरटीओच्या माध्यमातून आरोपींचे नाव पत्ता मिळवला. मात्र,अजून आरोपीला पकडण्यात आलेलं नाही. 
--
सेल्फी कल्चर धोकादायक 
सध्या तरुणाईत सेल्फी कल्चरची धूम आहे. सेल्फी काढून घेण्यासाठी युवक-युवती आटापिटा करताना दिसतात. सेल्फीसोबतच स्वत:चे फोटो काढून घेण्यासाठी युवक युवती धोक्याच्या ठिकाणी जाऊन जोखीम पत्करतानाही दिसतात. त्यामुळे अनेकांच्या जीवावर बेतल्याचे आणि अनेकांना गंभीर दुखापत झाल्याचे माहित होऊनही युवक-युवती त्यापासून धडा घ्यायला तयार नाही.  प्रज्वल आणि त्याच्या मित्रांनी रविवारी जंगलासारख्या निर्जन ठिकाणी जाऊन  फोटोशूटच्या प्रयत्न केला. १७ - १८ वर्षांची मुले बघून लुटारूंनी त्यांना लुटण्याचा प्रयत्न केला आणि ही घटना घडली.