शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना आॅनलाइन प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षांसाठी करणार प्रश्नावली तयार - राज्य शिक्षण मंडळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 01:26 IST

अभियांत्रिकी, वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी आता स्पर्धा परीक्षांच्या धर्तीवर प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आल्या आहेत. देशपातळीवर या परीक्षा होतात.

मुंबई : अभियांत्रिकी, वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी आता स्पर्धा परीक्षांच्या धर्तीवर प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आल्या आहेत. देशपातळीवर या परीक्षा होतात. गेल्या दोन ते तीन वर्षांत या परीक्षांमधील गोंधळ वाढत असून, या परीक्षांमध्ये राज्य शिक्षण मंडळाचे विद्यार्थी मागे पडत असल्याचे चित्र काही प्रमाणात दिसून येते. त्यामुळे आता राज्य शिक्षण मंडळ विद्यार्थ्यांना आॅनलाइन प्रशिक्षण देणार असल्याचे मंडळातर्फे जाहीर करण्यात आले.उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना एमएचसीईटी, जेईई, नीट परीक्षेच्या अभ्यासात सहाय्य मिळावे, म्हणून आॅनलाइन पोर्टल सुरू करण्यात येणार आहे. इयत्ता ११ वी आणि १२ वीच्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित आणि संख्याशास्त्र या विषयांची तयारी या पोर्टलवर करून घेण्यात येणार आहे. ‘आॅनलाइन प्रीपरेशन पोर्टल’वर या विषयांची प्रश्नपेढी तयार करण्यात येणार आहे. या प्रश्नपेढीसाठी शिक्षण, विषयतज्ज्ञ यांना प्रश्नपेढीत भर टाकण्याचे जाहीर आवाहन केले आहे.शिक्षकांनी पोर्टलसाठी प्रश्न द्यायचे आहेत, त्यांनी विषयनिहाय प्रश्न तयार करून प्रश्नांच्या तक्त्याची इयत्ता, विषय, घटकाचे नाव, उपघटक उत्तराच्या विश्लेषणासह ३० सप्टेंबरपर्यंत मंडळाच्या संकेतस्थळावर अपलोड करायचे आहे.यासाठी शिक्षकांनी http:/neetqb.mh-hsc.ac.in  या संकेतस्थळावर प्रश्न अपलोड करायचे आहेत. शिक्षकांनी प्रश्न पाठविताना विषयांवर फक्त बहुुपर्यायी स्वरूपाचे असावेत. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाºया परीक्षांचा अभ्यासक्रम हा वेगळा असल्याने, या पोर्टलवर देण्यात येणारे प्रश्न परीक्षेत विचारतील असे नाही, पण या प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांना सराव होणार आहे, असे मंडळातर्फे सांगण्यात आले.

टॅग्स :Studentविद्यार्थी