शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

एसटीचा संप मिटला आता ‘शिवशाहीचा’ सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 06:53 IST

दोन महिन्यांपासून वेतन मिळत नसल्याचा आरोप करत, एसटी महामंडळातील शिवशाहीच्या खासगी चालकांनी बुधवार, १३ जूनपासून दुपारी १२ वाजल्यानंतर संप पुकारला, यामुळे कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या शिवशाहीच्या अनेक फे-या रद्द करण्यात आल्या.

- महेश चेमटेमुंबई : दोन महिन्यांपासून वेतन मिळत नसल्याचा आरोप करत, एसटी महामंडळातील शिवशाहीच्या खासगी चालकांनी बुधवार, १३ जूनपासून दुपारी १२ वाजल्यानंतर संप पुकारला, यामुळे कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या शिवशाहीच्या अनेक फे-या रद्द करण्यात आल्या. या संपामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने भाडेतत्त्वावर १ हजार ५०० शिवशाही एसटी ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय घेतला. जून २०१८पर्यंत सात खासगी कंपनीच्या ३७५ शिवशाही राज्याच्या मार्गात धावत आहेत. यात ५० शिवशाहींचाही समावेश आहे. श्री कृपा कंपनीचे चालक गेल्या दोन महिन्यांपासून वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत. कंपनीकडून वेतनाच्या मुद्द्यावर चालढकल करण्यात येत असल्याचे चालकांचे म्हणणे आहे.श्री कृपा कंपनीच्या महामंडळात एकूण ३६ शिवशाही धावत आहेत. यात मुंबई-६, रत्नागिरी-१४, ठाणे-६, सातारा-२ , लातूर आणि बीड प्रत्येकी ४ अशा शिवशाहींचा समावेश आहे. यापैकी रत्नागिरी विभागातील चालकांनी बुधवार, १३ जूनपासून दुपारी १२ वाजल्यापासून संप पुकारला. परिणामी, रत्नागिरी विभागातून मुंबईकडे येणाºया सुमारे १०-१२ शिवशाहींच्या फेºया रद्द करण्यात आल्या. फेºया रद्द झाल्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. कंपनीतील अधिकाºयांशी संवाद साधला असता, नाव न छापण्याच्या अटीवर त्यांनी सांगितले की, ‘एसटी महामंडळाकडून गेले दोन महिने शिवशाहीचे बिल मिळालेले नाही. यामुळे चालकांना वेतन कधी मिळणार, हा प्रश्न सतावत आहे. मात्र, लवकरच चालकांना वेतन देण्यात येईल’.शिवशाहीच्या अन्य खासगी कंपनीशी संवाद साधला असता त्यांनीही महामंडळात शिवशाहीचे बिल देण्याबाबत अडचणी असल्याचे खासगीत मान्य केले.शिवशाहीच्या खासगी चालकांचा संप तसेच रद्द केलेल्या प्रवाशांच्या परताव्याबाबत महामंडळाचे वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक रा. रा. पाटील यांच्याशी वारंवार संपर्क साधला; मात्र त्यांचा फोन व्यस्त होता. तर शिवशाहीचे विभागीय व्यवस्थापक एस. जोशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणी काही कल्पना नाही. माहिती घेऊन कळवतो, असे सांगितले.कराराचे उल्लंघनएसटीतील वरिष्ठ अधिकाºयांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, कराराप्रमाणे वातानुकूलित बसचा डिझेल प्रतिलीटर ४ किलोमीटर अ‍ॅव्हरेज निश्चित करण्यात आला होता. मात्र, खासगी कंपनीच्या बस चालकांकडून याचे उल्लंघन होत आहे. डिझेलची रक्कम सुमारे ४० टक्के अधिक असल्याने बिलिंग करण्यात उशीर होत आहे.शिवशाहीची सद्यस्थितीमहामंडळाच्या : ४६३भाडेतत्त्वावरील (बैठ्या) : ३२५भाडेतत्त्वावरील (शयनयान) : ५०एकूण : ८३८

टॅग्स :ShivshahiशिवशाहीStrikeसंपMaharashtraमहाराष्ट्र