शहरं
Join us  
Trending Stories
1
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
2
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
3
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
4
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले
5
विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का
6
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
7
"लग्नानंतर ४ वर्षांनी घटस्फोट झाला आणि...", Divorce बद्दल पहिल्यांदाच बोलला स्वप्नील जोशी
8
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
9
Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...
10
धक्कादायक! पुण्यात नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात गुन्हा दाखल
11
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
निवेदिता सराफ यांच्याकडून घडलेली 'ती' चूक, अशोक सराफ यांनी पत्नीला चांगलंच सुनावलं
13
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
14
घरातल्या कमोडमध्ये झाला मोठा धमाका, वेस्टर्न टॉयलेटचा स्फोट होऊन तरुण गंभीर जखमी!
15
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
16
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
17
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
18
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
19
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
20
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ

तंटामुक्तीचा आलेख घसरला !

By admin | Updated: October 6, 2014 00:06 IST

तीन वर्षांत केवळ ३९३ गावांना विशेष पुरस्कार.

ब्रम्हानंद जाधवमेहकर (अकोला) : महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाला मिळत असलेल्या प्रतिसादाचा आलेख दिवसेंदिवस घसरत असल्याचे चित्र आहे. तीन वर्षांत केवळ ३९३ गावांना तंटामुक्तीचा विशेष पुरस्कार मिळाला आहे.गावातील तंटे गावातच मिटविण्यासाठी राज्यभर महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान राबविण्यात येत आहे. गावात तंटे निर्माण होऊ नयेत, दाखल असलेले खटले व नव्याने निर्माण होणारे तंटे सर्वसहमतीने मिटविण्यासाठी आणि सामाजिक शांतता प्रस्थापित होऊन राज्याची शांततेतून समृद्धीकडे वाटचाल व्हावी, या हेतूने १५ ऑगस्ट २00७ पासून हे अभियान सुरू झाले. तंटामुक्त अभियानात विशेष कामगिरी करणार्‍या गावांना विकास कामांसाठी गृह विभागातर्फे पुरस्कार देण्यात येतात. सुरवातीला या मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळाला. पहिली तीन वर्षे पुरस्कार मिळविण्यासाठी राज्यातील सर्वच गावांमध्ये चढाओढ होती. मात्र त्यानंतर या अभियानाला विशेष सकारा त्मक प्रतिसाद मिळताना दिसत नाही. २00७-0८ मध्ये २ हजार ३२८, २00८-0९ मध्ये २ हजार ८११ व २00९-१0 मध्ये ४ हजार २४९ म्हणजेच पहिल्या तीन वर्षांत एकूण ९ हजार ३८८ गावांना तंटामुक्त पुरस्कार मिळाला. ८७७ गावांना तंटामुक्तीचा विशेष पुरस्कार देण्यात आला होता. परंतु त्यानंतरच्या तीन वर्षांत तंटामुक्त अभियानास अल्प प्रतिसाद दिसून येत आहे. २0१0-११ मध्ये ३ हजार ८२४, २0११-१२ मध्ये २ हजार ७१२ व २0१२-१३ मध्ये १ हजार ७४१ म्हणजेच मागील तीन वर्षांत एकूण ८ हजार २७७ गावांना तंटामुक्त पुरस्कार मिळाला असून, केवळ ३९३ गावांना तंटामुक्त विशेष पुरस्कार मिळाला आहे.