शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये दमदार; नगरला ४ तालुक्यांत अतिवृष्टी, गंगापूर धरणातून विसर्ग : पानशेत, वरसगाव धरणे भरली, पाण्याचा प्रश्न निकाली निघणार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 05:09 IST

राज्यात पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी सुखावला असून पुणे, नाशिक, नगरला धरणक्षेत्रात धुव्वाधार पाऊस होत आहे. पुणे, नाशिक जिल्ह्यातील बहुसंख्य धरणे भरत आली आहेत. नाशिकला गंगापूर धरणातून विसर्ग सुरू झाला आहे. नगरला चार तालुक्यांत अतिवृष्टी झाल्याने पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे.

नाशिक/पुणे/अहमदनगर /औरंगाबाद : राज्यात पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी सुखावला असून पुणे, नाशिक, नगरला धरणक्षेत्रात धुव्वाधार पाऊस होत आहे. पुणे, नाशिक जिल्ह्यातील बहुसंख्य धरणे भरत आली आहेत. नाशिकला गंगापूर धरणातून विसर्ग सुरू झाला आहे. नगरला चार तालुक्यांत अतिवृष्टी झाल्याने पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे.पुणे जिल्ह्यात डिंभे धरणातून १५ हजार ५१८, चासकमान धरणातून १२ हजार ८९६ क्युसेक्सने नदीपात्रात विसर्ग करण्यात येत आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस खडकवासला (९३ मिमी) धरण क्षेत्रात झाला. या प्रकल्पात ८५.४२ टक्के साठा झाला आहे. पानशेत, वरसगाव धरणे जवळपास भरली आहेत. नीरा खोºयातील भाटघर, नीरा देवघर आणि वीर आणि गुंजवणी धरण क्षेत्रातही चांगला पाऊस झाला आहे. पवना धरण व मावळातील सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत.नाशिकला ‘दम’धारनाशिक जिल्ह्यात इगतपुरी व त्र्यंबके श्वर तालुक्यांमध्ये सर्वाधिक पाऊस झाला. सुमारे तीन आठवड्यांनंतर पावसाने ‘दम’धार हजेरी लावल्याने गंगापूर धरणातून सातत्याने हजारो क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.गौतमी, काश्यपी, आळंदीसह गंगापूर धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे. गोदावरीला पूर आल्याने नदीकाठच्या गावांत सतर्कतेचा इशारा दिला आहे.पश्चिम विदर्भात पावसाची तूटविदर्भात पावसाने विश्रांती घेतली आहे. पश्चिम विदर्भात अकोला (३२%), वाशिम (२४%), अमरावती (३९%) तर यवतमाळमध्ये (३५%) पावसाची तूट कायम आहे.मराठवाड्यात पाणीसाठ्यात वाढनांदेडला पाणी पुरवठा करणाºया विष्णुपुरी प्रकल्पातील साठ्यात मोठी वाढ झाली. जायकवाडी धरणात दोन दिवसांत २२.६० द.ल.घ.मी. आवक झाली आहे. परभणीतील लेंडी नदीला पूर आल्याने पाच व धामोडी नदीला पूर आल्याने आठ गावांचा संपर्क तुटला होता. नांदेड महापालिका आयुक्त व अतिरिक्त जिल्हाधिकाºयांच्या घरात पाणी घुसले.