शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

भररस्त्यात अल्पवयीन मुलीची छेड काढून मारहाण, नागरिकांची बघ्याची भूमिका, आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 06:29 IST

छेडछाड करून भररस्त्यात अल्पवयीन मुलीला अमानुष मारहाण केल्याची घटना मंगळवारी कुर्ला येथे घडली.

मुंबई : छेडछाड करून भररस्त्यात अल्पवयीन मुलीला अमानुष मारहाण केल्याची घटना मंगळवारी कुर्ला येथे घडली. धक्कादायक बाब म्हणजे, हा प्रकार सुरू असताना केवळ बघ्यांची गर्दी झाली होती; कोणीही तिच्या मदतीसाठी पुढे आले नाही. पोलिसांनी शनिवारी आरोपीला विनयभंग आणि मारहाणीच्या गुन्ह्यात अटक केली.नेहरूनगर परिसरात कुटुंबीयांसमवेत राहणारी ही १६ वर्षीय मुलगी मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास खासगी शिकवणीसाठी बाहेर पडली. त्याच वेळी तिच्याच इमारतीत राहणाºया इम्रान शेखने मित्रांसोबत अश्लील शेरेबाजी केली.रागावलेल्या मुलीने न घाबरता याचा जाब विचारताच चिडलेल्या इम्रानने तिला भररस्त्यातच अमानुषपणे मारहाण करण्यास सुरुवात केली. ते पाहताच तिथे बघ्यांची गर्दी वाढली, ती मदतीसाठी विनवणी करीत होती; मात्र कोणीही पुढे येऊन तिला सोडवले नाही. मारहाणीत ती बेशुद्ध पडली. ही बाब तिच्या कुटुंबीयांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि नेहाला जवळच्या रुग्णालयात दाखल केले.नेहरूनगर पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून सुरुवातीला केवळ मारहाणीचाच गुन्हा दाखल करत इम्रानला अटक केली. मात्र जामिनावर इम्रानची त्यातून सुटका झाली. तिच्या कुटुंबीयांनी राज्य महिला आयोगाकडे धाव घेताच नेहरूनगर पोलिसांनी शनिवारी पीडित मुलीचा पुन्हा एकदा जबाब नोंदविला आणि या प्रकरणात विनयभंग गुन्ह्याचा समावेश करत इम्रानला पुन्हा बेड्या ठोकल्या आहेत.यापूर्वीही काढली होती छेडइम्रानने यापूर्वीही नेहाची छेड काढली होती. मात्र सुरुवातीला तिने त्याकडे दुर्लक्ष केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीवर विनयभंग, पॉक्सोचीही कारवाई केली. इम्रानने मुलीला मारहाण केली तेव्हा त्याच्या हातात कडे असल्याने नेहाला जास्त मार बसल्याचेही पोलिसांनी सांगितले.>नव्याने जबाब नोंदविलानेहरूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद खोपर्डे यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता, तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. मात्र तिच्या वैद्यकीय अहवालात नाकाला फ्रॅक्चर असल्याचे समोर आले. त्यामुळे तिचा नव्याने जबाब नोंदवून आरोपीला पुन्हा अटक केली, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Molestationविनयभंग