शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

रायगड जिल्हा अन्न व आैषध प्रशासनाची धडक कारवाई

By admin | Updated: July 11, 2017 18:30 IST

बेकायदा खाद्य पदार्थ व खाद्य पदार्थांशी निगडीत उत्पादनांना पायबंद घालण्याकरीता रायगड जिल्हा अन्न व आैषध प्रशासनाने हाती घेतलेल्या धडक माेहिमेंतर्गत मंगळवारी पनवेल

ऑनलाइन लोकमत
रायगड, दि. 11 - बेकायदा खाद्य पदार्थ व खाद्य पदार्थांशी निगडीत उत्पादनांना पायबंद घालण्याकरीता रायगड जिल्हा अन्न व आैषध प्रशासनाने हाती घेतलेल्या धडक माेहिमेंतर्गत मंगळवारी पनवेल तालुक्यांतील शिरढाेण येथील आरएनपी आॅईल अॅन्ड फूड्स प्रा.लि. या कंपनीवर छापा घालून, तब्बल 10 लाख 440 रुपये किमतीचा माेहरी आणि तिळाच्या तेलाचा बेकायदा साठा जप्त करण्याची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती रायगड अन्न व आैषध प्रशासनाचे उपायूक्त दिलीप संगत यांनी लाेकमत शी बाेलताना दिली आहे.
 
रायगड अन्न व आैषध प्रशासनाचे अन्न निरिक्षक बालाजी शिंदे यांच्या पथकाने केलेल्या या कारवाईत, 1 लाख 52 हजार 660 रुपये किमतीच्या माेहाेरी तेलाच्या 500 मि.लि.च्या 1 हजार 796 बाटल्या, 3 लाख 11 हजार 860 रुपये किमतीच्या माेहरी तेलाच्या एक लिटरच्या 2 हजार 12 बाटल्या, तर 5 लाख 35 हजार 920 रुपये किमतीच्या तिळाच्या तेलाच्या एक लिटरच्या 2 हजार 552 बाटल्या जप्त करण्यात आल्याचे संगत यांनी पूढे सांगीतले.
 
आरएनपी आॅईल अॅन्ड फूड्स प्रा.लि. या कंपनीकडे तेल वा खाद्य पदार्थ निर्मीतीचा काेणताही परवाना नसल्याचे तसेच  तेलाच्या शास्त्रीय चाचणीकरीता आवश्यक प्रयाेगशाळाही या कंपनीत नसल्याचे या कारवाई दरम्यान निष्पन्न झाले आहे. तेलाचे नमुने घेवून ते सरकारी प्रयाेगशाळेत तपासणीकरीता पाठविण्यात आले आहे. अन्न व आैषध कायद्यांन्वये कंपनीवर पूढील कारवाई करण्यात येत असल्याचे संगत यांनी अखेरीस सांगीतले.