शहरं
Join us  
Trending Stories
1
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
2
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
3
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
4
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
5
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
6
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
7
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
8
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
9
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
10
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
11
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
12
ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक
13
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
14
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
15
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
16
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप
17
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
18
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
19
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
20
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!

बेकायदा दारूविक्री करणाऱ्यांवर पोलिसांकडून धडक कारवाई

By admin | Updated: June 9, 2016 18:41 IST

परिसरातील अनेक गावांमध्ये खुलेआम दारूविक्री, अनेकांचे संसार उध्वस्त करून कंगाल करणारा मटका व जुगाराचे क्लब सुरू असताना त्याकडे दुर्लक्ष करणारे पोलीस खाते अचानक जागे झाले आहेत

मद्यपींनी घेतला धसका : खबऱ्यांकडून मिळते माहितीयवत : परिसरातील अनेक गावांमध्ये खुलेआम दारूविक्री, अनेकांचे संसार उध्वस्त करून कंगाल करणारा मटका व जुगाराचे क्लब सुरू असताना त्याकडे दुर्लक्ष करणारे पोलीस खाते अचानक जागे झाले आहेत. त्यांच्यावर आता कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. वरिष्ठांच्या आदेशामुळे ही कारवाई सुरू असल्याची माहिती बेकायदा धंदे करणाऱ्यांच्या खबऱ्यांकडून मिळत आहे.मागील काही दिवसांत यवत व परिसरात रात्रीच्या वेळी मद्यप्राशन करून वाहने चालविणाऱ्यांविरोधात पोलिसांनी थेट कारवाई सुरू केल्याने मद्यपींनी चांगलाच धसका घेतला आहे. मात्र मद्यपींवर कारवाई करताना यवत पोलीस दुजाभाव करत असल्याची भावना संबंधित कारवाई केलेले नागरिक व्यक्त करत होते. पोलीस स्टेशनपासून काही अंतरावर सुरू असलेले ढाबे व हॉटेलमधून बेकायदेशीपणे दारूविक्री सुरू असते. अशा हॉटेलच्या जवळपास थांबून दारू पिऊन जाणाऱ्या तळीरामांना पोलीस आपसूक पकडत होते. मात्र त्या ठिकाणी सुरू असणाऱ्या बेकायदा दारूविक्री करणाऱ्या हॉटेल चालकांवरच कारवाई का करीत नाहीत, असा प्रश्न संबंधित नागरिक व्यक्त करीत होते.मागील दोन दिवसांत यवत येथील गावठाण परिसर व बाजार मैदानात सुरू असणारा मोठा मटक्याचा अड्डा बंद आहे. तेथे आठवडे बाजार दिवस वगळता असणारी मटकाबहाद्दर मंडळींची गर्दी गायब झाली आहे. कारवाई होणार असल्याचा सुगावा लागल्याने संबधित मटकेबहाद्दर फरार झाले असल्याची चर्चा आता परिसरात रंगली आहे.काल रात्रीच्या सुमारास यवत पोलिसांनी यवत व परिसरातील कासुर्डी टोल नाका परिसरात अवैध दारूविक्री करत असल्याच्या संशयावरून अनेक ठिकाणी छापे मारले. यवतमधील हॉटेल श्रेयश, हॉटेल अन्नपूर्णा, नाथाचीवाडी येथील हॉटेल जय मल्हार, कासुर्डी टोलनाका येथील हॉटेल जयभवानी येथे पोलिसांनी छापे मारले. यावेळी तेथे बेकायदा देशी-विदेशी दारू मिळून आल्याने पोलिसांनी कारवाई केली असल्याची माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली. तसेच एका जुगार अड्ड्यावर छापा टाकून संबंधिताला ताब्यात घेतले असल्याचे पोलिसांनी सांगितले.ही कारवाई पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड, पोलीस नाईक संदीप कदम, दीपक पालखे, महेश बनकर, शिपाई गणेश झरेकर, संपत खबाले, रणजीत निकम, शितोळे यांनी केली.चौकट :- अवैध दारूविक्री, मटके व जुगार अड्डे यांच्यावर कारवाई करताना स्थानिक पोलीस, पुणे ग्रामीण पोलीस गुन्हे अन्वेषण शाखा यांच्याकडून वरिष्ठांचे आदेश आल्यानंतर कारवाई केली जाते. मात्र इतर वेळी सदर अवैध धंदे खुलेआमपणे सुरू असतात. स्थानिक पोलिसांचे जास्तीच्या कामामुळे तिकडे किती वेळ लक्ष देणार, अशी तक्रार कायम असते. तर अपुरे कर्मचारी असल्याचे अधिकारी वर्गाकडून कायम सांगितले जाते. ग्रामीण भागात कोट्यवधी रुपयांची माया जमा करणाऱ्या बेकायदेशीर प्रकारांवर वचक ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक यांनी विशेष पथक नेमावे, अशी मागणी होत आहे.