शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

मराठी सक्तीसाठी लवकरच कठोर कायदा; मंत्रिमंडळात चर्चेनंतर विधेयक आणणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 10:07 IST

विविध महामंडळे, शासकीय कंपन्या, नियोजन प्राधिकरणे, विकास महामंडळे यांच्यासाठीही हा कायदा लागू असेल. 

मुंबई : मुंबई महापालिकेसह राज्यातील महापालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींमध्ये मराठीचा वापर सक्तीचा करण्यात येणार आहे. त्यासाठीचे विधेयक याच अधिवेशनात आणण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला. याच कायद्यानुसार विविध महामंडळे, शासकीय कंपन्या, नियोजन प्राधिकरणे, विकास महामंडळे यांच्यासाठीही हा कायदा लागू असेल. राज्य सरकारी कार्यालयांमध्ये मराठीच्या वापराची कायद्याने आधीच सक्ती आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांबाबतही तसा कायदा असला तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही अशा तक्रारी आल्यानंतर आता नवा, पण अधिक कठोर कायदा आणण्याची भूमिका महाविकास आघाडी सरकारने घेतली आहे. या संबंधीचे विधेयक आज, गुरुवारी विधानसभेत मांडण्यात येईल. या विधेयकानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयात यापुढे मराठी भाषा अधिकारी नेमण्याची सूचना करण्यात येणार असून, जिल्हा मराठी भाषा समितीची अंमलबजावणी करण्याची सूचनाही या विधेयकाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या विधेयकाची अंमलबजावणी न झाल्यास संबंधितांविरोधात थेट शिस्तभंगाची कारवाई करण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. कायद्याची कठोर अंमलबजावणी न झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्याची तरतूद केल्याने कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणार आहे. या विधेयकानुसार कार्यालयीन कामजात आणि जनसंवादात मराठी भाषेचा वापर करणे आवश्यक असणार आहे. या विधेयकाच्या अधिनियम व त्यातील तरतुदींच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासन स्थानिक प्राधिकरणांच्या सर्व कार्यालयांना निदेश किंवा अनुदेश देऊ शकणार आहेत. या विधेयकामुळे राज्याच्या तिजोरीवर कोणताही आर्थिक भार पडणार नसल्याचे निश्चित करण्यात आले असून, या योजनांच्या अंमलबजावणीसाठी प्रोत्साहनपर बक्षिसांची तरतूद करण्यात आलेली नाही. या विधेयकामुळे राज्यातील स्थानिक जनतेला त्यांच्या भाषेत माहिती मिळणार असून, मराठी भाषेचा वापर न केल्याबाबतच्या तक्रारींची संख्या कमी होणार आहे.