शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

दोषींवर कठोर कारवाई केली जाईल; पुण्यातील घटनेनंतर चंद्रकात पाटलांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 10:12 IST

कोंढवा परिसरात बडा तालाब मस्जिद परिसरात रात्री दीडच्या सुमारास भिंत कोसळल्याने या दुर्घटनेत एकूण १५ जणांचा मृत्यू झाला आहे.

पुणे - कोंढवा परिसरात इमारतीची संरक्षण भिंत रात्री दीड वाजण्याच्या सुमारास कोसळली. या दुर्घटनेत एकूण १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर मातीच्या ढिगाऱ्याखालून ३ जणांना जिवंत बाहेर काढण्यात आले आहे. दरम्यान, घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. यानंतर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी या घटनेची चौकशी केली जाईल आणि यात दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. ते एका वृत्तवाहिनाला प्रतिकिया देताना बोलत होते.

कोंढवा परिसरात बडा तालाब मस्जिद परिसरात रात्री दीडच्या सुमारास भिंत कोसळल्याने या दुर्घटनेत एकूण १५ जणांचा मृत्यू झाला आहे.  या घटनेची माहिती मिळताच पुण्याचे पालकमंत्री चंद्रकात पाटील हे कोल्हापूर येथून पुण्याकडे रवाना झाले आहेत. तर याप्रकरणी बोलताना चंद्रकात पाटील म्हणाले की, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल. तसेच यात दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे ही पाटील म्हणाले. जिल्हाधिकारी यांना त्वरित एक समिती नेमून घटनेची चौकशी करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले असल्याचे चंद्रकात पाटील म्हणाले.

या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना नियमानुसार शासनाकडून आवश्यक ती मदत केली जाईल, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले. दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी राम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच मदत कार्याबाबत आवश्यक त्या सूचना केल्याचेही त्यांनी सांगितले.