शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वीज कर्मचा-यांना मारहाण करणा-यांवर कठोर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 04:05 IST

वीजबिल थकबाकी वसुलीसाठी जाणा-या महावितरण कंपनीच्या कर्मचा-यांना मारहाण करण्याचे प्रकार राज्यात दिवसेंदिवस वाढत असल्याच्या घटना गांभीर्याने घेत मारहाण करणा-यांविरोधात कठोर पोलीस कारवाई करण्याबाबत आग्रही असल्याचे संकेत महावितरण प्रशासनाने दिले आहेत.

मुंबई : वीजबिल थकबाकी वसुलीसाठी जाणा-या महावितरण कंपनीच्या कर्मचा-यांना मारहाण करण्याचे प्रकार राज्यात दिवसेंदिवस वाढत असल्याच्या घटना गांभीर्याने घेत मारहाण करणा-यांविरोधात कठोर पोलीस कारवाई करण्याबाबत आग्रही असल्याचे संकेत महावितरण प्रशासनाने दिले आहेत. दरम्यान, वीज कर्मचा-यांना मारहाण करणा-यांविरोधात गुन्हे नोंदविण्यात येत असून, आरोपीला दोन-तीन वर्षांपर्यंत कैद आणि दंडाची तरतूद आहे.महावितरण प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, वीज कर्मचाºयांना होणाºया मारहाणीच्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेता महावितरण प्रशासनाने आरोपींना तत्काळ अटक व्हावी आणि कठोर शिक्षा व्हावी याकरिता संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा सुरू केला आहे. वीज थकबाकी वसूल करायची नाही, विजेची चोरी पकडायची नाही, गळती थांबवायची नाही, शासकीय सेवा या मोफत वापरायच्या अशा घटना वाढत आहेत. थकबाकी वसूल केल्याशिवाय ग्राहकांना अखंडित आणि दर्जेदार वीजपुरवठा करणे अशक्य असल्याने अशा पद्धतीने महावितरणचा कारभार कसा चालवायचा, असा प्रश्न महावितरणपुढे निर्माण झाला आहे.महावितरण कार्यालयांना घेराव घालणे, कर्मचाºयांना कोंडून ठेवणे, तोडफोड-जाळपोळ करणे हे प्रकार होत असतील तर महावितरणच्या अधिकारी-कर्मचाºयांनी काम तरी कसे करायचे, असा प्रश्न कर्मचारी संघटना वारंवार उपस्थित करीत आहेत. उद्दिष्टाप्रमाणे वीज थकबाकी वसूल न झाल्यास वीजपुरवठा करणे अशक्य होईल. तरी वीज ग्राहकांनी महावितरणची बाजूही समजून घेणे आवश्यक आहे. काही थकबाकीदारांनी वीज वितरण कंपनीच्या कर्मचाºयांना मारहाण करणे, जिवे मारण्याची धमकी देणे, कार्यालयाची तोडफोड करणे हे प्रकार राज्यात वाढले आहेत, संबंधितांविरुद्ध गुन्हेही दाखल झाले आहेत, अशी माहिती प्रशासनाने दिली.