शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बंगल्यांवरून तणातणी; नीलम गोऱ्हेंचा बंगला पळवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 06:58 IST

पाडवी यांची रवानगी अ-५ बंगल्यावर

मुंबई : मंत्र्यांना वाटप करण्यात आलेल्या बंगल्यांवरुन तणातणी सुरूच असून विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा मंत्रालयाजवळील क-३ हा बंगला काँग्रेसचे मंत्री के.सी.पाडवी यांना देण्यात आला. यावर गोऱ्हे संतप्त झाल्यानंतर आता त्यांना बंगला परत दिला जाणार आहे. पाडवी यांची रवानगी आता अ-५ बंगल्यावर करण्यात आली आहे.विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून विजय वडेट्टीवार यांना ब-१ हा बंगला पूर्वीच देण्यात आला आहे. मात्र कालच्या वाटपात त्यांना अचानक अ-३ हा बंगला देण्यात आल्याने ते नाराज झाले. आज त्यांना पुन्हा पूर्वीचाच ब-१ हा बंगला देण्यात आला. ब-१ बंगला राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांना काल देण्यात आला होता. आज त्यांना अ-३ बंगला मिळाला.फडणवीस सरकारमधील क्रमांक दोनचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचा अ-९ हा बंगला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना देण्यात आला होता. पण काल तो राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांना देण्यात आल्याने दरेकर संतप्त झाले. बंगल्यातून त्यांची रवानगी अवंती-अंबरमधील फ्लॅटमध्ये करण्यात आली. तो बदलून देण्याची त्यांची मागणी आहे. मात्र, आज निघालेल्या आदेशात मुंडेंकडे अ-९ हा बंगला कायम ठेवण्यात आला आहे. शिवसेनेचे मंत्री संजय राठोड क-८ बंगल्यावर राहत होते. त्यांना क-१ हा बंगला देण्यात आला पण त्या बद्दल ते नाराज असल्याचे सांगण्यात येते. रात्री उशिरा त्यांना पुन्हा क-८ हा बंगला देण्यात आला.दीपक सावंत यांची नेतृत्वाबद्दल नाराजी!माजी आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी जाहीरपणे त्यांची नाराजी बोलून दाखविली. मला पक्षात कोणतीही जबाबदारी दिली जात नाही. आज मी केवळ शिवसैनिक आहे आणि शिवसैनिक म्हणून बांधलेले शिवबंधन ठेवायचे की नाही याचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून घेईन, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हे