पुणे-सातारा महामार्गावर एसटी-कंटेनर-कार-दुचाकीचा विचित्र अपघात; 6 गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 05:04 PM2017-08-27T17:04:12+5:302017-08-27T20:14:50+5:30

भोर, दि. 27 -  पुणे- सातारा महामार्गावर रविवचारी दुपारी एक विचित्र अपघात झाला. भोरला जाणा-या एसटीला मागून कंटेनरने धडक ...

Strange accident of ST-Container-car-bike on Pune-Satara highway; 6 critically injured | पुणे-सातारा महामार्गावर एसटी-कंटेनर-कार-दुचाकीचा विचित्र अपघात; 6 गंभीर जखमी

पुणे-सातारा महामार्गावर एसटी-कंटेनर-कार-दुचाकीचा विचित्र अपघात; 6 गंभीर जखमी

googlenewsNext

भोर, दि. 27 -  पुणे- सातारा महामार्गावर रविवचारी दुपारी एक विचित्र अपघात झाला. भोरला जाणा-या एसटीला मागून कंटेनरने धडक दिली. त्यामुळे एसटी समोरच्या कार आणि दुचाकीला धडकली. यामध्ये 22 प्रवासी जखमी झाले असून पाच ते सहा जण गंभीर आहेत. 

दुपारी स्वारगेटहून 1 वाजता भोरला जाणारी एसटी (एमएच 12, 1678) जुन्या कात्रज घाटातून शिंदवाडी व वेळू गाचाच्या दरम्यान जात असनाता पाठीमागून येणा-या कंटेरनरने तिला धडक दिली. त्यामुळे एसटी चालकाचे नियंत्रण सुटून तिने समोर असलेल्या कार व दुचाकीला ठोकले. या अपघातात एसटी, कंटेनेरसह दुचाकी व कार या दोन वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. 

अपघातात 22 प्रवासी जखमी झाल्याचा प्राथमिक आंदाज असून खेड शिवापूर येथील श्रेयस रूग्णालयात 9 तर श्र्लोक रूग्णालयात 13 जणांवर उपचार सुरू आहेत.

                 

     

{{{{dailymotion_video_id####x845ab8 }}}}

Web Title: Strange accident of ST-Container-car-bike on Pune-Satara highway; 6 critically injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.