शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
4
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
5
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
6
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
7
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
8
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
9
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
10
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
11
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
12
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
13
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
14
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
15
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
16
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
17
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
18
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
19
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
20
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान

महाराष्ट्र दिनाची कहाणी

By admin | Updated: May 1, 2016 09:54 IST

मे १ , इ.स. १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली. हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो.

ऑनलाइन लोकमत

 
मुंबई, दि. १ - मे १ , इ.स. १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली. हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो. २१ नोव्हेंबर इ.स.१९५६ च्या तारखेची ती संध्याकाळ होती. सकाळपासून फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते. राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले होते. 
मराठी बाण्याची मुंबई या अन्यायाने खवळून उठली होती.
 
सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून त्याचा जळजळीत निषेध होत होता. याचा संघटित परिणाम म्हणून कामगारांचा एक विशाल मोर्चा, तेव्हाच्या विवेकशून्य सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येणार होता. दुपार टळल्यानंतर, म्हणजे मुंबईतल्या शंभर-सव्वाशे कापडगिरण्यांमधील, कामगारांची चारची पहिली पाळी संपल्यानंतर गिरणगावातून मोर्चा निघेल, असा अंदाज होता. पण त्याला छेद देत प्रचंड जनसमुदाय,एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत,फ्लोरा फाउंटनकडे जमू लागला. 
 
हा मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळला जाईल, असा अंदाज होताच. कारण फोर्ट भागात जमाव आणि सभाबंदी जारी केली होती. सर्व कार्यालयांतील महिला कर्मचाऱ्यांना घरी पाठविले होते. जमावबंदीचा भंग करून, मुंबईकर फ्लोरा फाउंटनाच्या चौकात सत्याग्रहासाठी ठाण मांडून बसले होते. त्यानंतर थोड्या वेळातच विपरीत घडले. सत्याग्रहींना उधळून लावण्यासाठी लाठीमार करण्यात आला. मात्र, तरीही ते चौकातून हटत नाहीत म्हटल्यावर पोलिसांना गोळीबाराचा आदेश देण्यात आला. 
 
मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांचे "दिसताक्षणी गोळ्या" घालण्याचे पोलिसांना आदेश होते. प्रेक्षणीय फ्लोरा फाउंटनाच्या कारंज्यातील पाण्यासारख्याच शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या निदर्शकांच्या रक्ताच्या चिळकांड्या काळ्याभोर रस्त्यावर उडू लागल्या. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जानेवारी, इ.स. १९५७ पर्यंत जे १०५ आंदोलक हुतात्मे झाले, त्या मालिकेची ही सुरुवात होती. या सर्व हुतात्म्यांच्या बलिदानापुढे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारला नमते घेऊन १ मे, इ.स. १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करावी लागली. 
 
त्यानंतर इ.स. १९६५मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी झाली. हुतात्म्यांची नावे २१ नोव्हेंबर इ. स. १९५५ चे हुतात्मे १] सिताराम बनाजी पवार २] जोसेफ डेव्हिड पेजारकर ३] चिमणलाल डी. शेठ ४] भास्कर नारायण कामतेकर ५] रामचंद्र सेवाराम ६] शंकर खोटे ७] धर्माजी गंगाराम नागवेकर ८] रामचंद्र लक्ष्मण जाधव ९] के. जे. झेवियर १०] पी. एस. जॉन ११] शरद जी. वाणी १२] वेदीसिंग १३] रामचंद्र भाटीया १४] गंगाराम गुणाजी १५] गजानन ऊर्फ बंडू गोखले १६] निवृत्ती विठोबा मोरे १७] आत्माराम पुरुषोत्तम पानवलकर १८] बालप्पा मुतण्णा कामाठी १९] धोंडू लक्ष्मण पारडूले २०] भाऊ सखाराम कदम २१] यशवंत बाबाजी भगत २२] गोविंद बाबूराव जोगल २३] पांडूरंग धोंडू धाडवे २४] गोपाळ चिमाजी कोरडे २५] पांडूरंग बाबाजी जाधव २६] बाबू हरी दाते २७] अनुप माहावीर २८] विनायक पांचाळ २९] सिताराम गणपत म्हादे ३०] सुभाष भिवा बोरकर ३१] गणपत रामा तानकर ३२] सिताराम गयादीन ३३] गोरखनाथ रावजी जगताप ३४] महमद अली ३५] तुळशीराम पुंजाजी बेलसरे ३६] देवाजी सखाराम पाटील ३७] शामलाल जेठानंद ३८] सदाशिव महादेव भोसले ३९] भिकाजी पांडूरंग रंगाटे ४०] वासुदेव सुर्याजी मांजरेकर ४१] भिकाजी बाबू बांबरकर ४२] सखाराम श्रीपत ढमाले ४३] नरेंद्र नारायण प्रधान ४४] शंकर गोपाल कुष्टे ४५] दत्ताराम कृष्णा सावंत ४६] बबन बापू भरगुडे ४७] विष्णू सखाराम बने ४८] सिताराम धोंडू राडये ४९] तुकाराम धोंडू शिंदे ५०] विठ्ठल गंगाराम मोरे ५१] रामा लखन विंदा ५२] एडवीन आमब्रोझ साळवी ५३] बाबा महादू सावंत ५४] वसंत द्वारकानाथ कन्याळकर ५५] विठ्ठल दौलत साळुंखे ५६] रामनाथ पांडूरंग अमृते ५७] परशुराम अंबाजी देसाई ५८] घनश्याम बाबू कोलार ५९] धोंडू रामकृष्ण सुतार ६०] मुनीमजी बलदेव पांडे ६१] मारुती विठोबा म्हस्के ६२] भाऊ कोंडीबा भास्कर ६३] धोंडो राघो पुजारी ६४] ह्रुदयसिंग दारजेसिंग ६५] पांडू माहादू अवरीरकर ६६] शंकर विठोबा राणे ६७] विजयकुमार सदाशिव भडेकर ६८] कृष्णाजी गणू शिंदे ६९] रामचंद्र विठ्ठल चौगुले ७०] धोंडू भागू जाधव ७१] रघुनाथ सखाराम बीनगुडे ७२] काशीनाथ गोविंद चिंदरकर ७३] करपैया किरमल देवेंद्र ७४] चुलाराम मुंबराज ७५] बालमोहन ७६] अनंता ७७] गंगाराम विष्णू गुरव ७८] रत्नु गोंदिवरे ७९] सय्यद कासम ८०] भिकाजी दाजी ८१] अनंत गोलतकर ८२] किसन वीरकर ८३] सुखलाल रामलाल बंसकर ८४] पांडूरंग विष्णू वाळके ८५] फुलवरी मगरु ८६] गुलाब कृष्णा खवळे ८७] बाबूराव देवदास पाटील ८८] लक्ष्मण नरहरी थोरात ८९] ठमाबाई विठ्ठल सूर्यभान ९०] गणपत रामा भुते ९१] मुनशी वझीऱअली ९२] दौलतराम मथुरादास ९३] विठ्ठल नारायण चव्हाण ९४] देवजी शिवन राठोड ९५] रावजीभाई डोसाभाई पटेल ९६] होरमसजी करसेटजी ९७] गिरधर हेमचंद लोहार ९८] सत्तू खंडू वाईकर ९९] गणपत श्रीधर जोशी १००] माधव राजाराम तुरे(बेलदार) १०१] मारुती बेन्नाळकर १०२] मधूकर बापू बांदेकर १०३] लक्ष्मण गोविंद गावडे १०४] महादेव बारीगडी १०५] कमलाबाई मोहित