शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

प्रसार माध्यमांत दलित शब्दाचा वापर थांबवा - हायकोर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 00:22 IST

प्रसार माध्यमांद्वारे येणाऱ्या काळात अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांच्या बाबतीत दलित शब्दाचा वापर केला जाणार नाही यासाठी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय आणि प्रेस कौन्सिल आॅफ इंडिया यांनी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दिला.

नागपूर : प्रसार माध्यमांद्वारे येणाऱ्या काळात अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांच्या बाबतीत दलित शब्दाचा वापर केला जाणार नाही यासाठी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय आणि प्रेस कौन्सिल आॅफ इंडिया यांनी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दिला. हा आदेश व्यापक सामाजिक बदल घडविणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते पंकज मेश्राम यांनी जनहित याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने ‘एस. पी. गुप्ता वि. राष्ट्रपती’ प्रकरणामध्ये शासकीय अभिलेखातून ‘दलित’ शब्द काढून टाकण्याचे निर्देश दिले होते. लता सिंग वि. उत्तर प्रदेश सरकार व अरुमुगम सेरवाई वि. तामिळनाडू सरकार प्रकरणामध्ये ‘दलित’ शब्द घटनाबाह्य असल्याचे म्हटले आहे. अनुसूचित जाती आयोगाचेदेखील हेच मत आहे. ‘दलित’ शब्द आक्षेपार्ह व जातीवाचक आहे. ‘दलित’ शब्दाऐवजी अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध शब्दाचा सर्वत्र वापर करण्यात यावा, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे होते. न्या़ भूषण धर्माधिकारी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.केंद्र सरकारने काढली अधिसूचनाही याचिका प्रलंबित असताना केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाने गेल्या १५ मार्च रोजी अधिसूचना जारी करून, सरकारी दस्तावेजांवर अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांच्या बाबतीत दलित शब्द वापरण्याला बंदी केली आहे. तसेच, सर्व राज्य सरकारे व केंद्रशासित प्रदेशांना यासंदर्भात निर्देश देण्यात आले आहेत. केंद्र सरकारने ही अधिसूचना उच्च न्यायालयात सादर केली.राज्य सरकारची सकारात्मक भूमिकाराज्य सरकारही अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांच्या बाबतीत दलित शब्द वापरण्याला बंदी करणार आहे. यासंदर्भात राज्य सरकार सकारात्मक असून याविषयी येत्या चार आठवड्यांत निर्णय जारी केला जाईल, अशी ग्वाही उच्च न्यायालयाला देण्यात आली. उच्च न्यायालयाने सरकारचे हे वक्तव्य रेकॉर्डवर घेतले.

टॅग्स :Courtन्यायालय