शहरं
Join us  
Trending Stories
1
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
2
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
3
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
4
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
5
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
6
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
7
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
8
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
9
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
10
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
11
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
12
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
13
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
14
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
15
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
16
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
18
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
19
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
20
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार

काँग्रेसचे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन

By admin | Updated: August 12, 2016 02:19 IST

मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. काँग्रेसच्या वतीने महामार्गावर हमरापूर फाटा येथे जिल्हा परिषदेच्या सदस्या कौसल्या पाटील

वडखळ/पेण : मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. काँग्रेसच्या वतीने महामार्गावर हमरापूर फाटा येथे जिल्हा परिषदेच्या सदस्या कौसल्या पाटील, माजी विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.महामार्गावर पळस्पे ते इंदापूर दरम्यान विशेषत: खारपाडा ते वडखळ पर्यंत रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून रस्त्याची पूर्णत: दैना झाली आहे. तसेच हमरापूर फाटा ते सोनखार, दादर व कोपर फाटा ते कोपर या रस्त्यावर देखील जागोजागी खड्डे पडले आहेत. याविरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने मुंबई-गोवा महामार्गावर हमरापूर फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यात जि. प. सदस्या कौसल्या पाटील, माजी विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील, युवा नेते ललित पाटील, अ‍ॅड. प्रशांत पाटील, प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस नंदा म्हात्रे, तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष अविनाश पाटील, यशवंत घासे, माजी अध्यक्ष अनंत पाटील, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील, शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष हितेश पाटील, महिला अध्यक्षा पूजा मोकल, पंचायत समिती सदस्या लक्ष्मी पाटील यांच्यासह विभागातील सरपंच, सदस्य तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.वैकुंठ पाटील म्हणाले की, आज हमरापूर-दादर रस्ता तसेच महामार्गावर शेकडो खड्डे पडले आहेत, परंतु स्थानिक आमदार काहीही करत नाहीत. फक्त निवडणुकीच्या काळात येतात, नंतर गायब होतात असे सांगितले. येथून ये-जा करताना प्रवाशांना त्रास सहन करावा लगत आहे. त्यामुळेच हे आंदोलन करत आहोत, प्रसिद्धी मिळवण्यासाठी नाही असे सांगून जर का येत्या आठ दिवसांत सर्व खड्डे भरले गेले नाहीत तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. यावेळी कौसल्या पाटील, अनंत पाटील, अविनाश पाटील, मच्छिंद्र पाटील, शिवाजी पाटील आदींनीही खड्ड्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.यावेळी सुप्रीम कन्स्ट्रक्शन कंपनीचे अधिकारी विनित गोवेकर यांनी येत्या २५ आॅगस्टपर्यंत महामार्गावरील सर्व खड्डे भरले जातील असे लेखी आश्वासन शिष्टमंडळाला दिले. तसेच हमरापूर-दादर रस्त्यावरील खड्डे देखील भरले जातील असे बांधकाम खात्याचे अधिकारी करपे यांनी सांगितले. पोलीस उपअधीक्षक जयसिंग तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.