शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सीओ-एटीव्हीएम सेवा बंदच

By admin | Updated: July 23, 2016 02:26 IST

तिकीट खिडक्यांच्या रांगेतून प्रवाशांची सुटका करण्याचा निर्णय घेत एटीव्हीएम आणि जेटीबीएस मशिन मुंबई उपनगरीय स्थानकांवर बसवण्यात आले.

मुंबई : तिकीट खिडक्यांच्या रांगेतून प्रवाशांची सुटका करण्याचा निर्णय घेत एटीव्हीएम आणि जेटीबीएस मशिन मुंबई उपनगरीय स्थानकांवर बसवण्यात आले. त्याला पर्याय म्हणून कॅश कॉइन आॅपरेटेड मशिन (सीओ-एटीव्हीएम) बसवण्यात आले. या यंत्राला चांगला प्रतिसाद मिळत असतानाच त्यात काही गैरप्रकार होत असल्याचे नुकतेच निदर्शनास आले. हे पाहता सुरुवातीला या मशिनमधून स्मार्ट कार्डला तात्पुरता विराम दिला असतानाच यात आता कॅश आणि कॉइन टाकून तिकीट देणाऱ्या सेवेलाही विराम देण्यात आला आहे. रेल्वे बोर्डानेच देशभरातील रेल्वे स्थानकांवर असणाऱ्या सीओ-एटीव्हीएम सेवेला तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेच्या क्रिस संस्थेमार्फत आॅक्टोबर २0१५ मध्ये मध्य रेल्वेवर सीओ-एटीव्हीएम सेवेचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवर ही सेवा सुरू करण्यात आली. मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गांवर एकूण १७0 मशिन्स बसवण्यात आली आहेत. पुणे, त्याचबरोबर देशभरातील काही रेल्वे स्थानकांतही ही सुविधा सुरू करण्यात आली. पाच आणि १0 रुपयांची नाणी तसेच ५ रुपयांपासून ते एक हजार रुपयांपर्यंतच्या महात्मा गांधीजींच्या सीरिजमधील नोटा मशिनमध्ये टाकताच त्यातून प्रवाशांना तिकीट मिळते. तसेच स्मार्ट कार्डव्दारे तिकीट देण्याचीही सुविधा उपलब्ध आहे. मात्र मुंबई व पुण्यातील स्थानकांत एका व्यक्तीकडून त्यात गैरप्रकार करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. त्या व्यक्तीला पुण्यातून अटक करण्यात येताच त्याच्याकडे २२ स्मार्ट कार्डही असल्याचे आढळले. यातील काही स्मार्ट कार्डचा गैरवापर करण्यात आला होता. ही बाब समोर येताच सीओ-एटीव्हीएममधील स्मार्ट कार्ड सेवा १४ जुलैपासून बंद करण्यात आली. मात्र खबरदारीचे उपाय म्हणून रेल्वेकडून कॅश आणि कॉइनची सेवाही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची अंमलबजावणी १६ जुलैपासूनच करण्यात आली आहे. याबाबत क्रिस संस्थेचे (मुंबई) महाव्यवस्थापक उदय बोभाटे यांनी सांगितले की, रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार ही सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. यातील तांत्रिक बाबी सोडवण्यात येत आहेत. लवकरच सीओ-एटीव्हीएम सेवा येईल. सुरुवातीला यातून स्मार्ट कार्डची सुविधा बंद करण्यात आली होती. आता कॅश कॉइनची सुविधाही बंद करण्यात आली आहे. देशातील स्थानकांवर त्याची अंमलबजावणी केली जाईल. (प्रतिनिधी) >कॅश कॉइनची सुविधाही बंदक्रिस संस्थेचे (मुंबई) महाव्यवस्थापक उदय बोभाटे यांनी सांगितले की, रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार ही सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. यातील तांत्रिक बाबी सोडवण्यात येत आहेत. लवकरच सीओ-एटीव्हीएम सेवा येईल. सुरुवातीला यातून स्मार्ट कार्डची सुविधा बंद करण्यात आली होती. आता कॅश कॉइनची सुविधाही बंद करण्यात आली आहे.