शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पोटफुगीवर (डंबा) ने घेतला चिमुकल्याचा बळी

By admin | Updated: July 8, 2016 21:03 IST

कुपोषणामुळे जगाच्या नकाशावर आलेल्या मेळघाटात आजही आदिवासींमध्ये अंधश्रद्धेचा पगडा भारी असल्याचे पुन्हा उघड झाले आहे.

अघोरी पद्धत: मेळघाटातील आदिवासींवर अंधश्रद्धेचा पगडा नरेंद्र जावरे , अमरावती कुपोषणामुळे जगाच्या नकाशावर आलेल्या मेळघाटात आजही आदिवासींमध्ये अंधश्रद्धेचा पगडा भारी असल्याचे पुन्हा उघड झाले आहे. सात महिन्यांच्या चिमुकल्याचे पोट फुगल्याने त्याला आजीने ‘पोटावर’ गरम विळ्याचे चटके (डंबे) दिले, त्यातून त्याला न्युमोनिया झाला. शेवटच्या क्षणी त्याला रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र त्या चिमुकल्याचे प्राण वाचू शकले नाही. हा गंभीर प्रकार बुधवारी चुरणी ग्रामीण रुग्णालयात घडला. आमीर किरण कास्देकर (७ महिने, रा. जवलगाव) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. आमीर २ जुलै रोजी आजारी पडला होता. पोटावर सूज दिसत असल्याने त्याच्या आजीने त्याला गरम विळ्याचे चटके (डंबे) दिले. पोटफुगीला आदिवासी पोपसा म्हणतात. पोटावर गरम विळ्याचे चटके दिले की आजार बरा होतो, असा त्यांचा गैरसमज आहे. मात्र सात महिन्याच्या चिमुकल्या आमीरला चटके दिल्याने तो तापाने फणफणला. ४ जुलै रोजी रात्रभर आमीर रडत असल्याचे त्याच्या आजीने अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करला सांगितले. दोघींनी ५ जुलै रोजी आमीरच्या आईला दिवसभरात दवाखान्यात येण्याची गळ घातली. सायंकाळी ४ वाजता ती तयार झाली आणि चुरणी ग्रामीण रुग्णालयात त्याला भरती करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी निखील उप्पलवार यांनी त्याचेवर तत्काळ उपचाराला सुरुवात केली. नवरा कामाला, सासु-सूनेचा अबोला आमीरचे वडील किरण कास्देकर अमरावती येथे कामावर आहेत तर सून आणि सासुचे पटत नसल्याने दोघींमध्ये अबोला आहे. किरण कास्देकरला दोन मुले असून आमीर केवळ सात महिन्याचा होता. उपचारादरम्यान मृत्यूआमीरला डंब्यामुळे न्युमोनिया व सर्दी खोकला झाला. त्याला गंभीर अवस्थेत चुरणी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. त्याचेवर रात्रंदिवस शर्तीचे उपचार करण्यात आले. मात्र बुधवारी रात्री ८ वाजता त्याची प्राणज्योत मालवली. डंबा पद्धतीचा अघोरी उपचार मेळघाटात कुठल्याही आजारावर गरम विळ्याचे चटके देवून घरगुती किंवा गावातील भूमका (मांत्रिका) कडे जावून उपचार करण्याची प्रथा आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा हा प्रकार आहे. गतवर्षी सुद्धा असाच प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला होता. त्या चिमुकल्यावर अमरावतीनंतर नागपूर येथे उपचार करण्यात आले होते. आज तो बालक सृदृढ आहे. ‘आमीरला त्याच्या आजीने आठ दिवसांपूर्वी डंबे दिले होते. त्यातून त्याच्या शरिरात इन्फेक्शन होवून ताप व सोबत सर्दी खोकला झाल्याने न्युमोनिया झाला. महत्प्रयासाने रुग्णालयात आणून त्याचेवर उपचार केले. मात्र तो चिमुकला दगावला. - निखील उप्पलवार वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय, चुरणी मेळघाटातील आदिवासी बांधवात मोठया प्रमाणात डंबा पद्धतीचा वापर होतो. शासनाने जनजागृतीसाठी ठोस पाऊले उचलण्याची गरज आहे. स्वयंसेवी संस्थांच्या भरवशावर राहणे योग्य नाही. इतक्या वर्षात स्वयंसेवी संस्थांनी कुठले कार्य केले, याचा तपशील पुढे येणे गरजेचे आहे. - पीयूष मालवीय सामाजिक कार्यकर्ता, काटकुंभ.