शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

मातंग समाजाच्या मोर्चावर लाठीमार

By admin | Updated: December 19, 2015 01:59 IST

अनुसूचित जाती प्रवर्गातील आरक्षणापासून वंचित असलेल्या घटकांना सरकारने न्याय द्यावा, या मागणीसाठी लोकस्वराज्य आंदोलनचे संस्थापक प्रा. रामचंद्र भरांडे यांच्या नेतृत्वात

नागपूर : अनुसूचित जाती प्रवर्गातील आरक्षणापासून वंचित असलेल्या घटकांना सरकारने न्याय द्यावा, या मागणीसाठी लोकस्वराज्य आंदोलनचे संस्थापक प्रा. रामचंद्र भरांडे यांच्या नेतृत्वात विधिमंडळावर काढण्यात आलेल्या मोर्चावर पोलिसांनी जबर लाठीमार केला. त्यात प्रा. भरांडे यांच्यासह पाचजण गंभीर तर २५ मोर्चेकरी किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना मेयो रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. मातंग समाजाच्या मागणीसाठी नांदेड ते नागपूर पायीवारी करीत शुक्रवारी सकाळी मोर्चेकरी नागपुरात पोहचले. दुपारी यशवंत स्टेडियम येथून मोर्चाने विधिमंडळाकडे कुच केली. मोर्चात मोठ्या संख्येने महिला, लहान मुली, वृद्धांचा समावेश होता. मोर्चा श्रीमोहिनी परिसरात पोहचल्यानंतर पोलीस पथक तेथे तैनात होते. मोर्चेकऱ्यांचे नेते भरांडे आणि काही तरुणांनी बॅरिकेट्स काढून विधिमंडळाकडे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना बराच वेळ थांबवून ठेवले. त्यामुळे मोर्चेकऱ्यांचा आक्रोश आणखी वाढला. एक-दोघांनी बॅरिकेट्स ओलांडून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मोर्चेकरी ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने, पोलिसांनी शेवटी लाठीमार करायला सुरुवात केली. वृद्ध महिला, पुरुष न बघता दिसेला त्याला झोडपून काढले. काही जणांनी श्रीमोहिनी कॉम्प्लेक्समध्ये पळ काढला. पोलिसांनी त्यांना शोधून काढत त्यांनाही चांगलाच चोप दिला. जीवाच्या आकांताने सैरावैरा पळालेल्या मोर्चेकऱ्यांच्या चपला, कपडे मोर्चास्थळी पडलेले होते. काही महिला लहान मुलांसोबत मोर्चात सहभागी झाल्या होत्या. लाठीमारामुळे त्यांची मुलांशी ताटातूट झाली. जखमींवर मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सरकारने ठेवला मोर्चेकरांवर ठपकामहाराष्ट्र राज्य संगणक परिचालक कंत्राटी संघटनेतर्फे १५ डिसेंबर रोजी काढण्यात आलेल्या मोर्चावर करण्यात आलेल्या लाठीहल्ल्यासाठी शासनाने मोर्चेकऱ्यांनाच जबाबदार धरले आहे. आंदोलन हिंसक झाल्यामुळेच त्यांच्यावर पोलिसांनी उपलब्ध बळाचा वापर केल्याचे निवेदन शुक्रवारी गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी विधानसभेत केले. या मोर्चात २० ते २५ हजार लोक सहभागी झाले होते. मोर्चेकरी बॅरिकेट्स तोडून विधानभवनाकडे धावू लागले. जळती लाकडे, दगड, विटा पोलिसांवर फेकू लागले होते, त्यामुळे उपलब्ध बळाचा वापर करून मोर्चेकऱ्यांना परतावून लवण्यात आले, असे शिंदे यांनी सांगितले.