ऑनलाइन लोकमत
गडचिरोली, दि. ८ - आरमोरी तालुक्यातील एका घरात बिबट्याने घरी रात्रभर मुक्काम ठोकल्याने खळबळ माजली.
आरमोरी तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या डोगंरतमाशी येथील एका महिलेच्या घराच्या मागील खोलीच्या खिडकीतून बिबट्याने स्वयंपाकघरात प्रवेश करून रात्रभर मुक्काम ठोकला. सदर घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. वन आणि पोलीस विभागाच्या कर्मचा-यांनी गावक-यांच्या मदतीने बिबट्याला पकडून जंगलात सोडून दिले.