शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पालघरमध्ये उष्माघाताचा राज्यातील पहिला बळी; १६ वर्षीय तरूणीचा चक्कर येऊन मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 07:23 IST

१६ वर्षीय अश्विनी रावतेचा चक्कर येऊन मृत्यू

हितेन नाईक/आरिफ पटेल, लोकमत न्यूज नेटवर्कपालघर/मनोर: राज्यभरात उन्हाचा कडाका वाढला असून, पालघरमध्ये उन्हाच्या झळा आणि वाढत्या तापमानामुळे पारा चाळिशी पार गेला आहे. या वाढत्या तापमानाचा बळी पालघरच्या  विक्रमगड तालुक्यातील १६ वर्षीय विद्यार्थिनी अश्विनी विनोद रावते ठरली आहे. केव (वेडगेपाडा) येथे राहणारी अश्विनी रावते एस. पी. मराठी विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज मनोर येथे अकरावीच्या वर्गात शिकत होती. सोमवारी अकरावीच्या परीक्षेचा पेपर देऊन अश्विनी घरी आली. घरी आई-वडील नसल्याने ती शेतावर गेली. 

मात्र, शेतावरही आई-वडील न दिसल्याने  ती पुन्हा घराकडे निघत होती. तेव्हा भोवळ येऊन शेतातच कोसळली. नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेली अश्विनीची आई घरी आल्यानंतर तिला अश्विनीची बॅग दिसली. मात्र, अश्विनी न दिसल्यामुळे आई तिच्या शोधासाठी बाहेर पडली. त्यावेळी अश्विनी शेतामध्ये बेशुद्धावस्थेत  पडल्याचे दिसून आल्यानंतर तिने तत्काळ मदतीसाठी लोकांना बोलवून घेतले. अश्विनीला उपचारासाठी मनोर येथील खासगी रुग्णालयात आणल्यावर  डॉक्टरांनी मृत घोषित केले. वाढलेल्या तापमानामुळे उष्माघाताने तिचा मृत्यू झाल्याचे  निदान डॉक्टरांनी केल्याचे नातेवाइकांनी सांगितले. अश्विनीच्या अंगावर कुठेही जखमा किंवा साप चावल्याचे व्रण नव्हते. बेशुद्ध अवस्थेत ती दोन तास कडाक्याच्या उन्हात पडून राहिल्याने तिचा मृत्यू झाला आहे, असे तिच्या एका नातेवाइकाने ‘लोकमत’ला सांगितले. 

शाळांना सुट्टी जाहीर करातापमानाचा वाढता पारा लक्षात घेता शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. सरकारने हस्तक्षेप करावा असेही ते म्हणाले. उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने अगोदर का नोंदविली नाही, असा सवाल त्यांनी केला. गेले काही दिवस मुंबई, ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, कोकण भागात दिवसाचे सरासरी तापमान जवळपास ४० अंशांपर्यंत गेले आहे. शिक्षण विभागाकडून अहवाल मागविण्यात आला असून शिक्षण आयुक्त यासंदर्भात लवकरच निर्णय जाहीर करतील, असे मनसेचे चेतन पेडणेकर म्हणाले.

मुंबईपेक्षा ठाणे ‘हॉट’मुंबई महानगर प्रदेशात उष्णतेच्या लाटेने कहर केला असून, मंगळवारी मुंबईचे कमाल तापमान ३९.७ अंश सेल्सिअस, तर ठाण्याचे ४२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. चालू हंगामातील कमाल तापमानाचा मुंबईतील हा आतापर्यंतचा हा उच्चांक आहे. बुधवारीही उष्णतेची लाट कायम राहील, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

टॅग्स :palgharपालघर