अकोला : बलात्कारप्रकरणातील आरोपी युवक व पीडित युव तीचा ९ सप्टेंबर रोजी राज्य महिला आयोगाच्या सदस्य डॉ. आशा मिरगे यांनी जबाब नोंदविला. जबाबामध्ये लग्न करून युवकाने तिचे सातत्याने लैंगिक शोषण केले आणि नंतर त्याने संसार करण्यास नकार दिल्याचा आरोप केला आहे. शहरातील एका ज्वेलर्समधील २३ वर्षीय युवतीसोबत इटारसी येथील मोहनिश अनिल खंडेलवाल (२८) याने लग्नाचे नाटक करून तिच्यावर सातत्याने बलात्कार केला. या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. आरोपीचा न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केल्याने, पीडित युवतीने राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीनुसार ९ सप्टेंबर रोजी राज्य महिला आयोगाच्या सदस्य डॉ. आशा मिरगे यांनी आरोपी मोहनिश खंडेलवाल याच्यासह पीडित युवतीचाही जबाब नोंदविला. ** राज्य महिला आयोगाचा ब्रेन मॅपिंगसाठी पुढाकारबलात्कार प्रकरणातील पीडिता व आरोपी युवक आपापली बाजू मांडत आहेत. त्यामुळे कोण खरे व कोण खोटे आहे. त्यासाठी दोघांचीही ब्रेन मॅपिंग होणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य महिला आयोगाच्या सदस्य डॉ. आशा मिरगे यांनी पुढाकार घेतला आहे; परंतु ब्रेन मॅपिंगसाठी प्रचंड खर्च आहे. तो कोण करणार, हा प्रश्न आहे; परंतु राज्य महिला आयोग, शासनाने ब्रेन मॅपिंगला संमती दिली तर ब्रेन मॅपिंगचा राज्यातील पहिला निर्णय ठरेल.
राज्य महिला आयोगाने नोंदविला पीडित युवती व आरोपीचा जबाब
By admin | Updated: September 12, 2014 01:23 IST