शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
3
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
4
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
5
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
6
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
7
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
8
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
9
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
10
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
11
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
12
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
13
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
14
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
15
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
16
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
17
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
18
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
19
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
20
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात पुढचे पाच दिवस कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 10:29 IST

मराठवाडा, विदर्भाची चिंता वाढली

पुणे/मुंबई : मराठवाडा, विदर्भ, खान्देशात पुरेशा पावसाअभावी चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली असताना राज्यात १७ जुलैपर्यंत म्हणजे पाच दिवस पाऊस हुलकावणीच देईल, असा इशारा हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.

मान्सूनचा अक्ष बदलल्याने उत्तर भारत, ईशान्य भारतात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत आहे. त्यामुळे दक्षिण भारतासह राज्यात मान्सून क्षीण झाला आहे. परिणामी, १७ जुलैपर्यंत राज्यात कोकण वगळता पावसाचा जोर राहणार नाही. उर्वरित राज्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळतील, असे वेधशाळेने कळविले आहे.

हवामान तज्ज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी म्हणाले, राज्यात १७ जुलैपर्यंत मान्सूनचा खंड पडेल. त्यानंतर पाऊस पुन्हा सक्रिय होईल. दर मोसमात मान्सूनचा अक्ष एक-दोनदा बदलत असतो. ही सामान्य बाब आहे. राज्यात यंदा दोन आठवडे पाऊस उशिरा सुरु झाला. मराठवाड्यात आधीच पाऊस कमी पडतो. यंदा तो देखील पुरेसा नाही. म्हणून मराठवाड्यात या खंडाची तीव्रता अधिक असेल. विदर्भात देखील यंदा सरासरीपेक्षा पाऊस कमी झाला आहे.

मुंबई, नाशिक, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग वगळता राज्यात दमदार पाऊस झालेला नाही. मराठवाड्यात आजवर ३० टक्क्यांच्या आसपास पाऊस होण्याची अपेक्षा असताना फक्त १५.७ टक्के पाऊस झाला आहे. अशीच कमीजास्त परिस्थिती विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांची आहे. 

पश्चिम महाराष्ट्राची परिस्थिती चांगली

कोकण, पश्चिम महाराष्ट्रात उशीरा परंतु धुवाँधार पाऊस झाल्याने धरणांमधील साठा समाधानकारक झाला आहे. महाराष्ट्राचे वरदायिनी असलेल्या कोयना धरणात गेल्या सात दिवसांत २४ टीएमसीने पाणीसाठा वाढला आहे. तर सध्या साठा ४२ टीएमसीच्या वर आहे. पुण्याला पाणीपुरवठा होणारे खडकवासला आणि कळमोडी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे तर गुंजवणी आणि पानशेत धरणातील पाणीसाठा निम्म्यावर पोचला आहे. मुंबईची परिस्थितीही तुलनेने चांगली आहे.जलप्रकल्प तहानलेलेच

अर्धा पावसाळा झाल्यावरही राज्यातील जलप्रकल्पांमध्ये केवळ १९ टक्केच साठा आहे. मराठवाड्यातील प्रकल्पांत फक्त ०.२३% साठा आहे. जायकवाडीची पातळीदेखील अजून मृतसाठ्याच्या वरती आलेली नाही. राज्यात दोन हजार ८६८ लघू प्रकल्प असून त्यामध्ये १७.९२ टक्के, २५८ मध्यम प्रकल्पांमध्ये २९.७२ टक्के तर १४१ मोठ्या प्रकल्पांमध्ये ३३.१४ टक्के पाणीसाठा आहे. 

टॅग्स :Rainपाऊस