शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस भरती घोटाळ्याची राज्यभर व्याप्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 06:48 IST

पोलीस भरती घोटाळ्याची राज्यभर व्याप्ती असल्याची माहिती पुढे आली आहे़ नांदेड पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून रोज नवनवी माहिती मिळत आहे.

नांदेड : पोलीस भरती घोटाळ्याची राज्यभर व्याप्ती असल्याची माहिती पुढे आली आहे़ नांदेड पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून रोज नवनवी माहिती मिळत आहे. प्रवीण भटकर व त्याच्या सहकाऱ्यांनी १७ जिल्ह्यांतील भरती प्रक्रियेच्या सॉफ्टवेअरचे काम घेतले असून, तोच घोटाळ्याचा मास्टरमाइंड असल्याची माहिती पोलिसांच्या हाती आली आहे़ काही पोलीस अधिकारीही संशयाच्या भोवºयात सापडले आहेत.नांदेड पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेत ओएमआर (आॅप्टिकल मार्क रीडिंग) पद्धतीने गुणवाढ केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे़ त्याआधारे पोलिसांनी १३ परीक्षार्थींसह २० जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे़ एसएसजी कंपनीचे दोन संचालक, एक पोलीस कर्मचारी यांच्यासह ११ परीक्षार्थींना अटक करण्यात आली आहे़ मुख्य आरोपी प्रवीण भटकरसह पाच जण फरार आहेत़प्रकरणाचा अहवाल पोलीस महासंचालकांना पाठविण्यात आला आहे़ मुख्यमंत्र्यांची पोलीस महासंचालक भेट घेऊन राज्यस्तरीय चौकशीची परवानगी मागण्याची शक्यता आहे़नोकरभरतीच्या उत्तरपत्रिका ओएमआर पद्धतीने तपासल्या जातात़ प्रवीण भटकरने वेगवेगळ्या सॉफ्टवेअर कंपनीचा प्रतिनिधी म्हणून अनेक जिल्ह्यांमध्ये ही कामे मिळविल्याचे समजते. डॉ़ विजय भटकर यांचा पुतण्या असल्याचे तो आवर्जून सांगायचा़ डॉ. भटकर यांनी मात्र तीन वर्षांपासून या कंपनीशी आपला कोणताही संंबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.पुण्यातील परीक्षेत गैरप्रकाराचा संशयपुण्यातील राज्य राखीव पोलीस दलाच्या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. नांदेड, औरंगाबाद, जालना तसेच पुण्यातील राज्य राखीव पोलीस दलाच्या परीक्षेतील ३० उमेदवारांच्या उत्तरपत्रिका लिहून, त्या मुख्य गठ्ठ्यात मिसळण्यात आल्याची माहिती आहे.ओएमआर स्कॅनिंगचे काम मिळाल्यानंतर भटकर मध्यस्थामार्फत उमेदवारांचा शोध घ्यायचा़ शिरिष अवधूत व स्वप्निल साळुंखे हे कंपनीचे संचालक गुण वाढवून घ्यायचे़ परीक्षार्थीचे काम झाल्यानंतरच ते पैसे घ्यायचे, अशीही माहिती पुढे आली आहे.चार मध्यस्थ : सध्या औरंगाबाद येथे असलेले पोलीस कर्मचारी नामदेव ढाकणे, शुक्राचार्य टेकाळे (एसआरपी), वाशिमचे शेख आगा, नांदेडचे दिनेश गजभारे हे चौघे मध्यस्थ होते़ त्यांनी नांदेडच्या पोलीस भरतीत गुणवाढीसाठी १३ उमेदवार शोधले. नामदेव ढाकणे व शुक्राचार्य टेकाळे यांनी देऊळगाव राजा येथील सहा उमेदवारांकडून पैसे घेतले होते़वडिलांकडूनही पैसे : नामदेव ढाकणे याने २००७ मध्ये स्वत:च्या भावाला पोलीस दलात नोकरी देण्यासाठी आपल्या वडिलांकडूनही पैसे घेतल्याची माहिती आहे़