शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

राज्य लोकसेवा आयोग पुन्हा चुकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2017 01:40 IST

पोलीस खात्यांतर्गत फौजदार पदासाठीच्या परीक्षेत राज्य लोकसेवा आयोगाने वयोमर्यादेची जुनीच अट कायम ठेऊन पुन्हा चूक केली.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पोलीस खात्यांतर्गत फौजदार पदासाठीच्या परीक्षेत राज्य लोकसेवा आयोगाने वयोमर्यादेची जुनीच अट कायम ठेऊन पुन्हा चूक केली. अखेर ही चूक तत्काळ सुधारण्याचे आदेश मुंबई ‘मॅट’चे अध्यक्ष अंबादास जोशी आणि उपाध्यक्ष राजीव अगरवाल यांनी गेल्या आठवड्यात आयोगाला दिले आहेत.फौजदार पदासाठी २०१७ ला पुन्हा राज्य लोकसेवा आयोगाने जाहिरात काढली. त्यात पुन्हा जुनीच चूक करताना ३३ व ३८ ही वयोमर्यादा कायम ठेवली आहे. एमपीएससीने केलेल्या या चुकीमुळे पोलीस कर्मचाऱ्यांना पुन्हा न्यायालयाचे दार ठोठावावे लागले आहे.नऊ पोलीस कर्मचाऱ्यांनी मुंबई ‘मॅट’मध्ये (महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण) वयोमर्यादेच्या वादाबाबत याचिका दाखल केली. त्यावर जोशी व अगरवाल यांच्यापुढे सुनावणी झाली. सामान्य प्रशासन विभागाच्या २३ एप्रिल २०१६ च्या परिपत्रकानुसार खुल्या प्रवर्गाला २८ ऐवजी ३३ आणि मागासवर्गीयांना ३८ ऐवजी ४३ ही सुधारित वयोमर्यादा लागू करावी, याबाबत राज्य लोकसेवा आयोगाने सुधारणा करावी, असे मौखिक आदेश ‘मॅट’ने दिले आहे. फौजदाराच्या भरती प्रक्रियेला आधीच औरंगाबाद खंडपीठाचा स्थगनादेश असताना पुन्हा स्थगनादेश देण्याची विनंती ‘मॅट’ने फेटाळून लावली. या प्रकरणात आता जुलैच्या पहिल्या आठवड्यात पुढील सुनावणी होणार आहे. याचिकाकर्त्यांच्यावतीने अ‍ॅड. अरविंद बांदिवडेकर यांनी काम पाहिले.