शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

राज्याला सकारात्मकतेची गरज

By admin | Updated: June 21, 2014 01:17 IST

कोणताही नवीन प्रकल्प हाती घेतला तर टीका सहन करावी लागते. महाराष्ट्राच्या राजकारणात वावरताना मलाही ती सहन करावी लागलीच; पण मी ती सहन केली.

मुंबई : कोणताही नवीन प्रकल्प हाती घेतला तर टीका सहन करावी लागते. महाराष्ट्राच्या राजकारणात वावरताना मलाही ती सहन करावी लागलीच; पण मी ती सहन केली. मात्र आता महाराष्ट्राने हा नकारात्मकपणा सोडला पाहिजे आणि चांगल्या बाबींना प्रोत्साहन देत सकारात्मक झाले पाहिजे, अशी अपेक्षा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली.
मॅक्सेल फाउंडेशनच्या वतीने उद्योगधंद्यात भरारी घेणा:या उद्योजकांना वरळी येथील नेहरू सेंटरच्या सभागृहात शरद पवार यांच्या हस्ते ‘मॅक्सेल पुरस्कारा’ने शुक्रवारी गौरविण्यात आले; त्या वेळी ते बोलत होते. या वेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, लार्सन अँड टुब्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी वाय.एम. देवस्थळी, निवृत्त न्यायाधीश अरविंद सावंत आणि मॅक्सेल फाउंडेशनचे सर्वेसर्वा नितीन पोदार उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, मी गेल्या 48 वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणात वावरतो आहे. या काळात राज्याच्या विधिमंडळाचे राजकारण पाहिले आहे. विरोधकांच्या टीका सहन केल्या आहेत. मात्र राजकारण आणि समाजकारणात टीका सहन करावी लागतेच. तशी मी सहन केली. उदाहरणच द्यायचे झाले तर एकेकाळी राज्याला विजेची खूप गरज होती तेव्हा मी विदेशी गुंतवणुकीच्या दाभोळ प्रकल्पासाठी प्रयत्न केले. मात्र विरोधकांनी टीका केली आणि तो प्रकल्प बंद पडला. परंतु पुन्हा चार वर्षानी तो सुरू झाला. शिवाय लवासाबाबतही तेच झाले. लवासावरही खूप टीका झाली. मात्र आजघडीला लवासाला कित्येक हजारो कुटुंबे भेटी देत आहेत. परंतु एका अर्थाने विचार करता नव्या उपक्रमांना टीका सहन करावी लागतेच. मात्र आता अशा नव्या उपक्रमांना, नव्या प्रयत्नांना प्रोत्साहन देणो गरजेचे आहे. म्हणून महाराष्ट्राने आता नकारात्मकपणा सोडत सकारात्मक झाले पाहिजे. शिवाय संशोधन क्षेत्रत उल्लेखनीय कामगिरी करत नव्या पिढीला वाचनाची गोडी लावली पाहिजे. 
डॉ. अनिल काकोडकर म्हणाले, आयआयटी मुंबईमध्ये आता कुठे दुसरा रिसर्च पार्क उभा राहतो आहे. चीनमध्ये आजघडीला असे तीनशे रिसर्च पार्क आहेत. म्हणजे आपण कुठे आहोत, याचा विचार करण्याची गरज आहे. विकासासाठी संशोधन करणा:या संस्थांना एकत्र आणण्याची गरज आहे. त्यांचे जाळे उभे केले पाहिजे. त्यांना बळ देण्याची गरज आहे. असे केले तरच ग्लोबल महाराष्ट्राचे स्वप्न साक्षात उतरेल. (प्रतिनिधी)
 
कुमार केतकर म्हणाले, आपली क्षेत्रे, आपल्या कक्षा आणि विकासाच्या व्याख्या आता बदलल्या आहेत. आपण आता हे समजावून घेण्याची गरज आहे. आजवर सजर्नशील प्रयत्नांना दिशा मिळाली नाही. 
परंतु आता ती देण्याची गरज आहे. महाराष्ट्राची ओळख आता जोपासण्याची आणि जपण्याची गरज आहे. शिवाय विकास म्हणजे नुसता जीडीपी नाही हेदेखील आपण ध्यानात ठेवले पाहिजे.
दरम्यान, शरद पवार यांच्या हस्ते अमेरिकेतील प्रख्यात भारतीय उद्योजक अशोक जोशी यांना या वेळी जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. 
शिवाय परशुराम जाधव, सीमा वैद्य-मोदी, संजय गायकवाड, निर्मला कांदळगावकर, प्रदीप लोखंडे, रवी पंडित आणि किशोर पाटील यांना मॅक्सेल पुरस्काराने गौरविण्यात आले.