चंद्रपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५० वी जयंती साजरी करण्यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समितीचे गठण करण्यात आले आहे. ग्रामविकास विभागाने सोमवारी हे आदेश काढले.मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखली राज्यस्तरीय समितीच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या समितीच्या सहअध्यक्ष आहेत. उजामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे हे समितीचे सदस्य असून ग्रामविकास विभागाचे सचिव या समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.महात्मा गांधींनी दिलेली शिकवण व आचारणात आणलेली मूल्ये आपल्या कृतीतून पुढे घेवून जाण्याकरिता तसेच त्यांचा सत्य, अहिंसेचा संदेश पुढील पिढ्यांपर्यंत जिवंत ठेवणे आवश्यक असल्याने सन २०१८ या वर्षापासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासंदर्भात केंद्र शासनाच्या स्तरावर एक समिती स्थापन करण्यात आली आहे.
महात्मा गांधीच्या १५०व्या जयंतीसाठी राज्यस्तरीय समिती; मुनगंटीवार अध्यक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 06:22 IST