शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

रिओ ऑलिम्पिक, पॅरा ऑलिम्पिक व महिला क्रिकेट संघातील खेळाडूंचा राज्य सरकार करणार सत्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 18:05 IST

रिओ ऑलिम्पिक, रिओ पॅरा ऑलिम्पिक व महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा या तीन स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त खेळाडू व त्यांचे क्रिडा मार्गदर्शक तसेच महाराष्ट्र राज्यातील सहभागी खेळाडू अशा एकूण 23 खेळाडूंचा राज्य सरकारच्यावतीने

मुंबई - रिओ ऑलिम्पिक, रिओ पॅरा ऑलिम्पिक व महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा या तीन स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त खेळाडू व त्यांचे क्रिडा मार्गदर्शक तसेच महाराष्ट्र राज्यातील सहभागी खेळाडू अशा एकूण 23 खेळाडूंचा राज्य सरकारच्यावतीने रोख पारितोषिक देऊन सत्कार करण्यात येणार आहे. क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते हा पारितोषिक वितरण समारंभ उद्या 28 सप्टेंबर, 2017 रोजी सह्यादी अतिथीगृह येथे दुपारी 3.30 वाजता होणार आहे.रिओ ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपट्टू साक्षी मलीक(हरियाणा) मार्गदर्शक कुलदिप सिंग, ॲथलेटिक्स ललीता बाबर, मार्गदर्शक भास्कर भोसले, रोईंगपट्टू दत्तू भोकनळ, हॉकीपट्टू देविंदर सुनिल वाल्मिकी, मॅराथॉनपट्टू कविता राऊत, नेमबाजीपट्टू आयोनिका पॉल, लॉन टेनिसपट्टू प्रार्थना ठोंबरे यांचा उद्या सत्कार होणार आहे. तसेच रिओ पॅरा ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेले खेळाडू उंचउडी- मरिय्यप्पन थंगावेलू, मार्गदर्शक सत्यनारायण, भालाफेक- देवेंद्र झाझरिया, राजस्थान, मार्गदर्शक सुनिल तंवर, गोळाफेक - दिपा मलीक, हरियाणा, मार्गदर्शक वैभव सरोही, उंचउडी - वरुन भाटी, नोयडा, मार्गदर्शक सत्यनारायण, जलतरण - सुयश जाधव यांचाही रोख पारितोषिक देऊन सत्कार करण्यात येणार आहे.आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये भारतीय संघाने अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली. या क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघ उपविजेते ठरले. या संघामध्ये महाराष्ट्राच्या क्रिकेटपट्टू असलेल्या मोना मेश्राम, पुनम राऊत, स्मृती मानधना, संघ व्यवस्थापक तृप्ती भट्टाचार्य, फिजोओ थेरेपिस्ट रश्मी पवार यांचाही उद्या सन्मान केला जाणार आहे.