शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

राज्य कर्मचाऱ्यांना २०१६ पासून ७वा वेतन आयोग

By admin | Updated: July 8, 2017 01:45 IST

सातवा वेतन आयोग १ जानेवारी २०१६ पासून लागू करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्यानंतर, राज्य सरकारी

विशेष प्रतिनिधी/ लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सातवा वेतन आयोग १ जानेवारी २०१६ पासून लागू करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्यानंतर, राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संघटनांनी १२ ते १४ जुलै रोजीचा नियोजित संप मागे घेतला. अन्य मागण्यांबाबत येत्या पाच महिन्यांत शासनाने निर्णय घ्यावा, असा अल्टिमेटम या संघटनांनी मुख्यमंत्र्यांना दिला.कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी मुख्यमंत्र्यांनी आज सायंकाळी वर्षा निवासस्थानी चर्चा केली. सातवा वेतन आयोग केंद्र सरकारप्रमाणे १ जानेवारी २०१६ पासून लागू केला जाईल, असे आश्वासन देताना, त्याचे प्रत्यक्ष फायदे कोणत्या महिन्यापासून देणार ते मात्र मुख्यमंत्र्यांनी सांगितले नाही. राज्याची आर्थिक परिस्थिती बघून योग्य तो निर्णय घेऊ, असे ते म्हणाले.पाच दिवसांचा आठवडा आणि निवृत्तीचे वय ६० वर्षे करावे, या दोन प्रमुख मागण्या कर्मचारी नेत्यांनी आजच्या चर्चेत मांडल्या. त्यावर या मागण्यांना जनतेतून विरोध आहे, तसेच काही प्रमुख राजकीय पक्षांचीदेखील या मागण्यांना हरकत असल्याची जाणीव मुख्यमंत्र्यांनी करून दिली. तरीही या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचा शासनाचा प्रयत्न असेल, असे ते म्हणाले. संप करण्याची ही वेळ नाही. शेतकरी कर्जमाफीमुळे राज्यावर मोठा आर्थिक भार पडला आहे. सध्या पेरण्यांचा काळ आहे, तसेच शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. अशा परिस्थितीत संप करणे कितपत योग्य आहे? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी कर्मचारी नेत्यांना केल्याचे समजते.राजपत्रित अधिकारी महासंघाचे नेते ग.दि.कुलथे यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, सातव्या वेतन आयोगाबाबत मुख्यमंत्र्यांनी आम्हाला ठोस आश्वासन दिले आहे. अन्य मागण्यांबाबत चालू वर्ष संपण्याआधी ते निर्णय  घेतील, अशी आमची अपेक्षा आहे. आजची चर्चा सकारात्मक झाली. चर्चेनंतर सर्व संघटनांच्या नेत्यांनी एकत्र बसून संप मागे घेण्याचा निर्णय घेतला.आजच्या चर्चेवेळी राज्याचे मुख्य सचिव सुमीत मल्लिक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी तसेच राजपत्रित महासंघाचे ग.दि. कुलथे, मनोहर पोकळे, समिर भाटकर, मीना आहेर, कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे योगिराज खोंडे, विश्वासराव काटकर, गजानन शेट्ये, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे भाऊसाहेब पठाण, जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे अण्णासाहेब मगर, अशोक थुल आदी नेते उपस्थित होते.